ETV Bharat / city

खत दरवाढीविरोधात स्वाभिमानीचे गुरुवारी आंदोलन

खत दरवाढीविरोधात स्वाभिमानीचे गुरुवारी आंदोलन होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Swabhimani Thursday agitation against fertilizer price hike
खत दरवाढीविरोधात स्वाभिमानीचे गुरुवारी आंदोलन
author img

By

Published : May 19, 2021, 9:17 PM IST

कोल्हापूर - केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून 20 मे रोजी केंद्र सरकारचा पुतळा जाळून संघटनेकडून निषेध नोंदविण्यात येणार आहे. दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून '#Stopfertilizerhike' च्या माध्यमातून सर्वांनी प्रश्न मांडा असेही आवाहन करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

खत दरवाढीविरोधात स्वाभिमानीचे गुरुवारी आंदोलन

'पंतप्रधानांना दरवाढ मागे घेण्याबाबत पत्र पाठवा'

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमती मागे घ्याव्या अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे उद्या सर्वच शेतकऱ्यांनी याबाबतचे पत्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पाठवावे असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी आवाहन केले आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत केलेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका शेतकर्‍यांना बसलेला आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमध्ये शेतकर्‍यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत 50 ते 60 टक्के दरवाढ झालेली आहे. कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्‍यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. डीएपीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. 2019मध्ये रासायनिक खतांच्या किंमतीत 50 टक्के दरवाढ झालेली होती. आता 50 ते 60 टक्के दरवाढ केली. म्हणूनच याच्या निषधार्थ राज्यभर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्याचे आवाहन शेट्टींनी केले. शेतकऱ्यांनी आपापल्या शेताच्या बांधावरून तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन करावे असेही शेट्टींनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.