ETV Bharat / city

भाजपाच्या 'त्या' ट्वीटनंतर आली जाग, 21 जुलैला स्वाभिमानीकडून राज्यव्यापी 'दूध बंद आंदोलन' - राजू शेट्टी बातमी

राज्य सरकारने दूध उत्पादकाला त्याच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये थेट अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने जीएसटी मागे घेऊन 30 हजार टन बफर स्टॉक करावा. निर्यात सबसिडी 30 रुपये द्यावी, या मागणीसाठी दूध बंद आंदोलन करत असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana Dudh Bandh Andolan
स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध बंद आंदोलन
author img

By

Published : Jul 17, 2020, 4:05 PM IST

कोल्हापूर - भाजपाच्या ट्वीट नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तत्काळ दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. दुधाचे दर उतरले आहेत. जवळपास 22 रुपये इतका सध्या दुधाला दर मिळत आहे. फडणवीस सरकारच्या काळात तो 32 रुपये इतका होता. दर इतके कमी झाले असताना राजू शेट्टी गप्प का? असा सवाल भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता. त्यावर शेट्टी यांनी विचार करत येत्या 21 जुलै रोजी राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. राज्यात कोणीही 21 जुलै रोजी दूध डेअरीवर दूध घालू नका असे, आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

आंदोलनाबाबत माहिती देताना शेट्टी म्हणाले की, सध्या दुधाचे दर 18 ते 20 रुपयांनी उतरले आहेत. दुधाचा उत्पादन खर्चच 28 रुपयांपर्यंत येतो. त्यामुळे हे दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. अजून किती दिवस तोट्यामध्ये दुधाचा व्यवसाय करायचा, हा दूध उत्पादकांसमोर प्रश्न आहे. तामिळनाडूमध्ये दुधासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादकांनी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : 'आत्मनिर्भर' बनत त्याने शोधली स्वयंरोजगाराची वाट!

दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दररोज 5 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो पुरेसा नाही. कारण राज्यात दररोज 1 कोटी 19 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. 86 लाख लिटर दुधाची पॅकिंगद्वारे विक्री होत होती. मात्र, लॉकडाऊन नंतर 67 लाखांपर्यंत ही आकडेवारी खाली आली आहे. म्हणजेच दररोज 52 लाख लिटर दूध दररोज अतिरिक्त होत आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाला सुबुद्धी सुचावी असेही शेट्टींनी म्हटले आहे.

  • आता कुठे गेले राजू शेट्टी आता दुधाला दर 22 रुपये आहे @Dev_Fadnavis सरकारच्या काळात तोच दर 32 रुपये होता. शेतकर्यांना युरिया भेटत नाही हीच का तुमची शेतकऱ्या विषयी आस्था आता तर तुम्हाला आमदारकी भेटणार आहे हीच का शेतकऱ्यांची किंमत?@rajushetti pic.twitter.com/RGWZdIfVYo

    — BJP Kolhapur (@BJP4Kolhapur) July 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय जनता पार्टीचे ट्वीट....

राज्य सरकारने दूध उत्पादकाला त्याच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये थेट अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने जीएसटी मागे घेऊन 30 हजार टन बफर स्टॉक करावा. निर्यात सबसिडी 30 रुपये द्यावी, या मागणीसाठी दूध बंद आंदोलन करत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. शिवाय 21 जुलै रोजी कोणीही दुधाची नासाडी करू नये, अगदी शांततेत आंदोलन करावे, असेही आवाहन शेट्टा यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.