ETV Bharat / city

Swabhimani Council : स्वाभिमानीची ऊस परिषद गुरवारी; राजू शेट्टींचे सरकारवर गंभीर आरोप - Swabhimani Farmers Association next Friday

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी ( Swabhimani Farmers Association Council ) होत आहे.यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात ( Raju Shetty serious allegations against Mahavikas Aghadi government) करून एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हा निर्णय तातडीने रद्द करावा.

Swabhimani Farmers Association Council
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद
author img

By

Published : Sep 11, 2022, 12:43 PM IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ( Swabhimani Farmers Association )21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी होणार ( Swabhimani Farmers Association Council ) आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty, president of Swabhimani Farmers Association ) यांनी याबाबतची घोषणा केली. नेहमीप्रमाणे जयसिंगपूर येथे विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावरती ही सभा होणार आहे. तसेच "जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा" यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 9 दिवस मोठ्या सभा घेणार असल्याची घोषणाही केली.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात Raju Shetty serious allegations against the Mahavikas Aghadi government करून एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय तातडीने रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी देखील केली आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. एकीकडे रासायनिक खतांचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच प्रमाणात एफआरपीमध्ये वाढ झालेली नाही. उलट केंद्र सरकारने एफआरपीचा बेस वाढवून 10.25 टक्क्यांवर वाढवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. एकरकमी एफआरपी हा शेतकऱ्यांचा कायद्याने दिलेला हक्क आहे असे असताना सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवली आहे असेही शेट्टी म्हणाले.

परिषदेआधी 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत 9 दिवस जागर यात्रा - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत 9 दिवस जागर यात्रा काढणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, गडहिंग्लज, निपाणी, येडेमच्छिंद्र, कुंडल, घुणकी, कागल, दत्तवाड, चंदगड, कोडोली, वळीवडे व कांदे या ठिकाणी एफआरपी जागर यात्रा काढून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे असेही शेट्टी म्हणाले.

संघर्ष अटळ; सरकारकडे ही मागणी - यावेळी बोलताना शेट्टींनी ऊस दरासाठी संघर्ष अटळ आहे असा इशारा सुद्धा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपुरात 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. एफआरपी दोन तुकड्याचा निर्णय राज्य सरकारने अगोदर रद्द करावा. सरकारला अजून 40 दिवस अवधी आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. आम्ही कधीही रस्त्यावरील लढाईला तयार आहोत. जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी आहे.

भारतात शिल्लक साखर नाही - बहुतेक देशात यंदा दुष्काळ आहे. भारतात शिल्लक साखर नाही. याचा लाभ आपण उठवावा. उसाचे क्षेत्र जादा असले तरी सर्व उसाचे गाळप करणे ही सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे. संघर्ष नको असेल तर तातडीने ऊस दरामध्ये राज्य सरकारने लक्ष घालून यावर निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक,राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जयकुमार कोले, पोपट मोरे, बाबासाहेब सांद्रे, आण्णासो चौगुले , सागर शंभुशेटे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.