ETV Bharat / city

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

author img

By

Published : Oct 9, 2020, 8:36 PM IST

एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. सरकारने परीक्षा पुढे ढकलल्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला असून, जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत परीक्षा घेण्यात येऊ नये, असेही विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.

Students celebration in Kolhapur
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

कोल्हापूर - एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. एकीकडे मुंबईमध्ये परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण बैठक होती. त्याचवेळी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. परीक्षा रद्द व्हावी अन्यथा परीक्षाच देणार नसल्याचा विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, बैठकीमध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर याच विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत एकमेकांना साखर भरवत आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा - आयटी कंपन्यांच्या भांडवली मुल्यात टीसीएस जगात प्रथम; अक्सेंचरला टाकले मागे

सरकारने परीक्षा पुढे ढकलल्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला असून, जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत परीक्षा घेण्यात येऊ नये, असेही विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने ठोस पावले उचलायला हवी होती. पण, शासनाने असे काहीच केले नाही. उलट मराठा आरक्षण स्थगितीनंतर मेगा पोलीस भरतीची जाहिरात काढली. त्याच्याआधी एमपीएससीची परीक्षा सरकारने अनेकदा पुढे ढकलली होती. आतासुद्धा मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून सरकारने ही परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक होते. जर रविवारी 11 तारखेची परीक्षा झाली असती तर याचा मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फटका बसणार होता. हा एक प्रकारचा मराठा समाजावर अन्याय झाला असता, असे विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.