कोल्हापूर - खासदारकीची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे फडणवीस (Sambhaji Raje Meet Fadnavis) यांच्याकडे गेले. अर्धा तास होते त्यात काही बोलणे झाले माहिती नाही. पण काहीतरी बोलले असतील. पण तिथून बाहेर पडल्यावर लगेच त्यांनी पक्षाची घोषणा केली आणि अपक्ष राहणार म्हणून जाहीर केले. पाठिंबा पाहिजे होता तर इतर नेत्यांकडेसुद्धा जाणे गरजेचे होते. तसा प्रयत्न केला पाहिजे होता. राज्यसभेसाठी गणित जुळवून न आणता पक्ष घोषित करणे हा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मतं जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत, असे भाष्य संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) यांनी केले आहे. शिवाय एक ड्राफ्ट झाला होता. मात्र, तेच पुढे फायनल झाले असते आणि मग विचार बदलला असता तर मग यू टर्न मारला म्हणता आले असते, असेही ते म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. त्यांचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही : छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर विषय वेगळा असता पण तसे काही झाले नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. आमच्यात काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसे काही झाले नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. घराण्याचा नव्हे म्हणजे मला विचारलेले नाही, किंवा माझी सहमती घेऊन पावले उचलली असे झाले नाही असा गौप्यस्फोट सुद्धा श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केला. फडणवीस यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी काय सल्ला दिला माहीत नाही. तुम्ही अपक्ष राहिला तर आम्ही पाठिंबा देतो असं कदाचित सुचवले असेल. फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेल घोषणा केली हे लिंक केले पाहिजे. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील पाठिंब्यासाठी हे गणित चुकले. राजकारणामध्ये असे एकदम होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात. छत्रपती घराण्याचे असल्यामुळे सगळे आपल्याकडे यायला पाहिजे असे होते. छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न नव्हता तर संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न होता. ओटोमेटीक सर्व झालं पाहिजे हे सगळं चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.
हेही वाचा - Sanjay Raut : 'राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमच्याकडून विषय संपला'
स्वराज्य पक्ष स्थापन करायचा होता तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नव्हती : ते पुढे म्हणाले, 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपने दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितले होते. दरम्यान, राज्यसभेवर जाण्याबाबत त्यांचे जानेवारीपासून सर्व चालू होते पण त्याची कल्पना काही दिली नव्हती. राज्यसभेमध्ये त्यांना जायचे होते तसा त्यांनी प्रयत्न केला. शेवटी लोकशाही आहे, त्यात काय चालतं हे सगळ्यांना माहित आहे. कुठं घोडं अडतंय हे त्यांना माहित असायला पाहिजे होते. एकीकडे स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडे राज्यसभा मिळवणार. स्वराज्य पक्ष स्थापन करायचा होता तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नव्हती. राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होते. दोन ते तीन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती. पण खूप उशीर केला होता त्यांनी असेही म्हणत त्यांनी संभाजीराजेंचे कान टोचले. कोणत्याही पक्षात गेले की बंधने आलीच. स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील असेही ते म्हणाले.
संजय पवारांचे अभिनंदन केले : संजय पवार यांना आधीच मिळायला पाहिजे होते. आता चांगले झाले. संजय पवार यां उमेदवारी मिळाल्यावर फोन केला अभिनंदन केले, असेही श्रीमंत शाहू छत्रपती यावेळी म्हणाले.
-
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
">छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
हेही वाचा - Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती यांचे राजकारण आणि घराण्याचा राजकीय इतिहास
संभाजीराजे यांची प्रतिक्रिया - छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.