ETV Bharat / city

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाइन अथवा ऑनलाईन यापैकी ज्या पद्धतीने घेणे शक्य होईल, त्या परीक्षा महाविद्यालयांनी व आधिविभागाने 21 मार्च पूर्वी घ्याव्यात अशा सूचना परीक्षा विभागाने दिल्या आहेत. पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयाने त्यांच्या पातळीवर घ्याव्यात, अशा सूचना देखील परीक्षा विभागाने दिल्या आहेत.

Shivaji University Kolhapur News
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर न्यूज
author img

By

Published : Mar 10, 2021, 4:41 PM IST

कोल्हापूर - कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात खंड पडलेल्या परीक्षांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. यंदा ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने असून विद्यार्थ्यांना ऐच्छिक पद्धतीने असणार आहे. अशी माहिती परीक्षा नियंत्रक गजानन पळसे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून
हिवाळी सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून

शिवाजी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून घेण्यात येणार आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षांसाठी ओएमआर शीटचा वापर करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 21 मार्च पूर्वी विद्यापीठातील आधी विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांनी पूर्ण कराव्यात, अशा सूचना परीक्षा विभागाने दिल्या आहेत. या हिवाळी सत्रामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर सत्रातील एकूण 621 अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यात प्रथम वर्षाच्या परीक्षांची संख्या 100 आहे. 80 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने यापूर्वीच केले आहे. या विविध अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक, त्यांचे स्वरूप पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाइन अथवा ऑनलाईन यापैकी ज्या पद्धतीने घेणे शक्य होईल, त्या परीक्षा महाविद्यालयांनी व आधिविभागाने 21 मार्च पूर्वी घ्याव्यात अशा सूचना परीक्षा विभागाने दिल्या आहेत. पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयाने त्यांच्या पातळीवर घ्याव्यात, अशा सूचना देखील परीक्षा विभागाने दिल्या आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेसाठी एक तासाची वेळ

या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ओएमआरशीट विद्यापीठाकडून पुरवण्यात यावी, अशी सूचना गुळवणी समितीने केली आहे. पन्नास गुणांच्या पेपरसाठी एक तास तसेच परीक्षांसाठी पंचवीस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा 50 गुणांचा पेपर असेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी एक तासाची वेळ असणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, शिक्षण शास्त्र, आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्लॅस्टर पद्धतीने होणार आहेत. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक गजानन पळसे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.