ETV Bharat / city

Vinayak Raut Criticize Rajesh Kshirsagar : क्षीरसागर यांनी विनायक राऊत अन् पटोलेंना घरी दिलेल्या जेवणाची कोल्हापुरात चर्चा

कोल्हापुरात पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsaga ) यांच्यावर जोरदार टीका केली.

Raut Criticize Rajesh Kshirsagar
विनायक राऊत यांची टीका
author img

By

Published : Jul 16, 2022, 10:54 PM IST

Updated : Jul 16, 2022, 11:00 PM IST

कोल्हापूर : आम्हाला घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांची वृत्ती आहे. त्यांनी मला आणि नाना पटोले ( Nana Patole ) यांना घरी जेवायला बोलावले आणि जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील ( Satej Patil) यांच्याकडून घेतला अशी टीका विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी काल मेळाव्यात केली होती. मात्र याचा स्वतः सतेज पाटील यांनी खुलासा केला असून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवाय क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी कसा देईल असेही म्हणत विनायक राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे विनायक राऊत कोल्हापूरात येऊन क्षीरसागर यांची चुकीचे सांगून बदनामी करून गेले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहुयात...

विनायक राऊत यांची राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका

काय म्हणाले होते विनायक राऊत आणि काय आहे नेमकं प्रकरण ? काल कोल्हापुरात पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतच बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती असे राऊत म्हणाले. त्याचाच धागा पकडत ते पुढे म्हणाले, आम्हाला घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही राजेश क्षीरसागर यांची वृत्ती आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीवेळी क्षीरसागर यांनी मला आणि नाना पटोले यांना घरी जेवायला बोलावले आणि जेवणाचा खर्च मात्र काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून घेतला अशी टीका केली. मात्र सतेज पाटील यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे राऊत यांनी केलेल्या टिकेकर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे यातून स्पष्ट होत आहे.

सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हणाले ? सतेज पाटील म्हणाले,विनायक राऊत यांचा तो त्यांचा राजकीय आरोप होता. मात्र तेव्हा तसे काही घडले नाही. नाना पटोले आणि राजेश क्षीरसागर हे गेली अनेक वर्ष विधिमंडळात सोबत काम केले आहेत. यामुळे राजेश क्षीरसागर यांनी स्वतः घरी जेवायला यावे असे आमंत्रण दिले होते. मग आता त्यांच्या घरच्या जेवणाचे बिल मी द्यायचा काय संबंध नाही. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणे योग्य नसल्याचेही सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. मात्र त्या जेवणाचा आणि माझा काही संबंध नाही असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय क्षीरसागर यांनी सुद्धा ही टीका खूपच खालच्या पातळीवर गेल्याचे म्हंटले असून आज सतेज पाटील यांनी सुद्धा याबाबत स्पष्टपणे खुलासा केला आहे असे म्हंटले.

खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी कोल्हापूरात झालेल्या मेळाव्यात क्षीरसागर टोकाची टीका केली, यास प्रतिउत्तर म्हणून क्षीरसागर यांच्या समर्थकांनी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार म्हणून त्यावेळी आयोजित मेजवानीचे खर्च केलेल्या जेवणाचे बिल स्पीड पोस्टने विनायक राऊत यांना पाठवून राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

हेही वाचा - Sanjay Raut on Cabinet Decision : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

Last Updated : Jul 16, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.