कोल्हापूर - एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांपाठोपाठ आता खासदारही गेले आहेत. यामुळे शिवसैनिक हे आक्रमक झाले असून येणाऱ्या निवडणुकीत बंडखोर आमदार व खासदार हे जिंकणार नाहीत, यासाठी वाटेल ते करू, असे शिवसैनिकांनी ठरवले आहे. दरम्यान कोल्हापुरात देखील खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे शिंदे गटात गेल्याने जिल्हाप्रमुख संजय पवार ( Shivsena District Chief Sanjay Pawar ) यांना अश्रू अनावर झाले. त्यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचे दिवस केले घरोघरी जाऊन प्रचार केला आणि संजय मंडलिक यांनी एका रात्रीत शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. हा मोठा धक्का आहे, अशा शब्दात संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेना आणखीन नव्याने उभी करु असा विश्वासही संजय पवारांनी बोलून दाखविला.
'हा मोठा धक्का' : खासदार संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेलेले पाहून आम्हाला मोठा धक्का बसला बाकीच्यांचे काही वाईट वाटले नाही. मात्र संजय मंडलिक यांच्याकडून आम्हा शिवसैनिकांना खूप अपेक्षा होत्या. पत्रकार परिषद असा किंवा मोर्चा असो या सर्वांमध्ये मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी आमच्या समोर व्यक्त केला होता. मात्र शिंदे सोबत जाऊन त्यांनी आम्हा शिवसैनिकांचा व मतदारांचा विश्वासघात का केला? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. यामुळे आम्ही चिंतेत आहोत याचा आम्हाला फार वाईट वाटले आहे थेट समोर सांगून गेले असते तर का वाटले नसते. मात्र त्यांनी आम्हाला फसवले आहे. यापुढे संजय मंडलिक यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही, अशा शब्दात संजय पवार यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका केले आहेत.
'जे आमदार खासदार गेले त्यांच्या जागी निष्ठावंत शिवसैनिक येणार' : आमदार गेले खासदार गेले मात्र निष्ठावंत शिवसैनिक हे अद्याप कोठेही गेलेले नाहीत आणि यांना संधी देत येणारी नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो या सर्वांमध्ये शिवसेना ताकतीने उतरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच येत्या 27 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरी करणारा असून जे आमदार आणि खासदार गेले त्यांच्या जागा आता रिकाम्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी निष्ठावंत शिवसैनिक येईल आणि त्यांनाच उमेदवारी द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे संजय पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा - CM On SC Hearing : राज्यघटनेनुसार सरकार बनवलं नियमबाह्य काहीही नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा