ETV Bharat / city

माणुसकी दाखवा.. दोन महिने घरभाडे घेऊ नका; सतेज पाटलांचे घरमालकांना आवाहन - सतेज पाटील यांच्याबद्दल बातमी

कोरोना विषाणूचा प्रसार राज्यासह देशात होत आहे. या पाश्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घरमालकांनी 2 महिन्याचे घरभाडे घेऊ नये अशे आवाहन केले. ते फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते.

satej-patil-appealed-house-owner-not-to-rent-the-house-for-2-month
माणुसकीच्या नात्याने 2 महिने घरभाडे घेऊ नका ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घरमालकांना केले आवाहन
author img

By

Published : Mar 30, 2020, 11:44 PM IST

कोल्हापूर - कोरोनाने जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे भारतात संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. संचारबंदी दरम्यान नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांशी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नागरिकांचे अनेक महत्वाचे प्रश्न आणि सूचना ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ही त्यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाडेकरूंकडून माणुसकीच्या नात्याने घरमालकांनी भाडे घेऊ नये, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

satej patil appealed house  owner  not  to rent the house for 2 month
माणुसकीच्या नात्याने 2 महिने घरभाडे घेऊ नका ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घरमालकांना केले आवाहन

फेसबुक लाईव्ह दरम्यान नागरिकांनी काही महत्वाचे प्रश्न गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विचारले त्यांची त्यांनी काय उत्तरं दिली यावर एक नजर

1) होम कोरोटाइन शिक्का असून बाहेर पडणाऱ्यांना दंड करा?

उत्तर : आयपीसी कलम 388 नूसार संबंधितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना संस्था क्वारंटाईन केले जाईल. तशी कार्यवाही प्रशासनाकडून सुरु आहे.

2) शहर उपनगरे तसेच ग्रामीण भागात लोक अजून खुलेआम पणे फिरतात त्या ठिकाणी पोलीस नियमित पाठवा?

उत्तर : कोरोनाबाबत जनजागृती सुरु असून लोकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलीस कारवाई करु शकत नाहीत. त्यामुळे लोकांनाची स्वत:वर बंधने घालून घ्यावीत.

3) भाजीपाला जागा व्यवस्थापन योग्य करा. भाजीपाला घेताना लोक गर्दी करतात, सोशल डिस्टंसिंग ठेवत नाहीत, प्रबोधन व्हावे?

उत्तर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयांतर्गत 31 ठिकाणी भाजीपाला विक्री केली आहे. योग्य सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासंदर्भात आयुक्त तसेच त्या-त्या विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता यांना सूचना दिल्या आहेत. सर्व नगरसेवकांना मी स्वत: व्ही.सी. घेवून याबाबत सूचना केल्या आहेत.

4) खाजगी डॉक्टरांचे दवाखाने सूरु करा, मग त्या डॉक्टर ना PPE किट द्या?

अँकर : जिल्हाधिकारी यांनी सर्व खाजगी डॉक्टरांना दवाखाने सुरु करणेबाबत आदेश दिले आहेत. सर्व डॉक्टरांनी आणीबाणीच्या काळात लोकांना आरोग्य सुविधा द्याव्यात, अशी मी त्यांना विनंती करतो. खाजगी डॉक्टरांनी आवश्यकता वाटल्यास PPE किटची मागणी करावी. गरज पाहून त्यांना ही किट दिली जातील.

5) भाड्याने राहणाऱ्या लोकांकडून मालकाने भाडे 2 ते 3 महिने घेऊ नये असे आदेश द्या?

ऊत्तर : सर्व घर मालकांनी माणुसकीच्या नात्यांने 2 महिने संबंधित भाडेकरु कडून भाडे घेवू नये. ज्यावेळी या भाडेकरूंची परिस्थिती सुरळीत होईल त्याच वेळी हे भाडे घ्यावे.

6) रिझर्व्ह बँकेने बँकांना 3-महिने हफ्ते घेऊ नका असे सांगितले, सर्व बँका, पतसंस्था हा नियम लागू होणार का?

उत्तर : राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे कर्जाच्या हप्त्याबाबत आरबीआय ने सर्वच बँकांना 1 मार्च ते 30 जून पर्यंत कोणताही हप्ता घेवू नये असे निर्देश दिले आहेत. तसेच पतसंस्थांनासुध्दा सहकार आयुक्तांकडून अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

7) शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाहीत, शेतकऱ्यांना कामाला जाताना अडवू नये त्यांना पेट्रोल डिझेल द्यावे?

उत्तर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार सर्वच पेट्रोलपंप मालकांना शेतकऱ्यांच्या शेतीकामाकरीता पेट्रोल-डिझेल देणेबाबत सुचना दिल्या आहेत. तसचे आजच भारत सरकारने सुद्धा याबाबत निर्णय घेतला आहे.

8) जिल्ह्यात एकूण 3 कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आहेत, त्यामुळे जिल्ह्यात आणि शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी काय केले आहे?

उत्तर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. प्रशासन यासाठी ठोस पाऊले उचलत आहे. पीपीई किट, एन 95 मास्क, फेस मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर, सोडीयम हायपोक्लोराईट या गोष्टी आरोग्य यंत्रणेला उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. राज्य शासनाच्या सूचनेनुसार सीपीआर मध्ये 100 खाटांची व्यवस्था कोरोना रुग्णांसाठी करुन ठेवलेली आहे. या ठिकाणी व्हेंटीलेटरची सुध्दा उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे.

9) ग्रामीण भागातील सरपंच आणि सदस्य यांना कडक सूचना द्या, काही ठिकाणी ते मास्क लावत नाहीत, लोकांना घेऊन चौकामध्ये उभे असतात?

उत्तर : आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात प्रभाग समिती व ग्रामसमिती ही संकल्पना सुरु केली आहे. लोकांना सुरक्षीतता मिळावी व जनजीवन व्यवस्थित रहावे यासाठी नगरसेवक तसेच सरपंच व त्यागावातील व भागातील जबाबदार लोकांच्याकडे याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या सर्वांनी जबाबदारीने काम करणे अपेक्षीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.