कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस ( Chhatrapati Sambhaji Maharaj Birthday ) आहे. त्यानिमित्ताने युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. मात्र, त्यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी संभाजीराजे छत्रपती यांना रोमॅंटिक गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या ( Sanyogeetaraje Birhtday Post On Sambhaji Maharaj ) आहेत.
संयोगीताराजे नेहमीच सोशल मीडियात सक्रिय असतात. संभाजीराजे छत्रपती यांचा 52 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संयोगीताराजे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना रोमॅंटिक गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. त्यामध्ये संभाजीराजेंचे कुटुंबीयांसोबतचे क्षण शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट
संभाजीराजे छत्रपती यांनी वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आहे. आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे. माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील. मात्र, माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवारांच्या शुभेच्छा
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही खासदार संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत ते म्हणाले की, श्रीमंत युवराज, खासदार संभाजीराजे छत्रपती आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना, असेही त्यांनी म्हटलं आहे.
-
श्रीमंत युवराज, खासदार @YuvrajSambhaji राजे छत्रपती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/WgpPz1OKRd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">श्रीमंत युवराज, खासदार @YuvrajSambhaji राजे छत्रपती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/WgpPz1OKRd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 11, 2022श्रीमंत युवराज, खासदार @YuvrajSambhaji राजे छत्रपती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/WgpPz1OKRd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 11, 2022
हेही वाचा - CM Comment On Bjp : आम्ही उठसूठ राजभवनाची वारी करत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला चिमटा