कोल्हापूर - ‘आवाज की दुनिया के बेताब बादशहा’ ज्यांना म्हटले जाते ते मोहम्मद रफी... त्यांची आज 40 वी पुण्यतिथी... कोल्हापुरात संजय नलवडे मित्र परिवार आणि डीजे लॅब यांच्या वतीने दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यात येते.
साडेतीन हजार पेक्षा अधिक गायक या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांना सांगितीक श्रद्धांजली अर्पण करत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीचे मोठे संकट असल्याने जिल्ह्यातील फक्त दहा प्रमुख गायकांच्या उपस्थितीत संजय नलवडे मित्रपरिवार आणि डीजे लॅब यांच्या वतीने मोहम्मद रफी यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली सोहळा पार पडला.
यावर्षी आयोजित सोहळ्याला कोरोनाचे ग्रहण लागले असले तरी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करत फक्त दहा जणांच्या उपस्थित महंमद रफी यांच्या फोटोचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित गायकांनी प्रामुख्याने खोया खोया चांद, बदन पे सितारे लपेटे हुये, बहारो फुल बरसाओ, ये चांद सा रोशन चेहरा यांसह अनेक अजरामर गाणी म्हणत मोहम्मद रफींना सांगितिक श्रद्धांजली वाहिली.