कोल्हापूर - पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रस्थापितांचे प्राबल्य असले तरी, या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड प्रस्थापितांना धक्का देईल, असा विश्वास मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर महिला उमेदवारी उभे करून राज्याच्या राजकारणात प्रवेश करेल. असेही खेडेकर म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा -चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी; अविश्वास ठराव मंजूर
पुणे पदवीधर मतदार संघाचे संभाजी ब्रिगेडची अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारानिमित्त आज मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोज कुमार गायकवाड यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केले. मात्र काही जण संभाजी ब्रिगेडच्या नावाचा वापर करून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा प्रकार गैर आहे. श्रीमंत कोकाटे यांचे नाव न घेता त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही, मात्र आमच्या पक्षाच्या नावाचा वापर करून ते मत मागत असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. यापुढे बोलताना खेडेकर, यांनी राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड प्रवेश करत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. या सर्व जागांवर महिलांना उमेदवारी देणार असल्याचं खेडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत'