कोल्हापूर - महाराष्ट्राचा जाहीर झालेला अर्थसंकल्प शेतकरी बांधवांसाठी अतिशय निराशाजनक असल्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. यावर सरकारकडून फुंकर घातली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - व्हीआरएस घेऊनही बीएसएनएलचे कर्मचारी कामावर.. ग्राहकांसाठी विनामोबदला देताहेत सेवा
शेतकर्यांचा सातबारा कोरा व्हावा, विनाशर्त कर्जमाफी मिळावी या रास्त अपेक्षाही पूर्ण होऊ शकलेल्या नाही. शेतकऱ्यांना देण्यात आलेलं अनुदान सुद्धा नाममात्र असून ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली त्यांना योग्य न्याय या अर्थसंकल्पात देण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. जे सरकार शेतकरी वर्गाचे हित जपत नाही, ते राज्याचे हित कसे जपणार? असा सवाल करत शेतकरी बांधवांना न्याय मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक जोर लावून त्यांना न्याय मिळवून देऊ असेही ते म्हणाले.
हेही वाचा - राजू शेट्टी म्हणतात... तर अर्थसंकल्पाबाबत अधिक आनंद झाला असता