कोल्हापूर : बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू करा. तसेच मेडिक्लेम योजना (demands of construction workers) सुरू करा यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) कामगार आघाडीच्या वतीने कोल्हापुरातील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्तांना देण्यात आले. कोल्हापुरातील दसरा चौकातून चालू झालेला मोर्चा व्हीनस कॉर्नर, गोकुळ हॉटेल मार्गे शाहूपुरी येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
अन्यथा हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा: प्रथम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी RPI कामगार आघाडीच्या वतीने आज कोल्हापुरातील कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बांधकाम कामगारांची जिवन योजना म्हणून समजले जाणारे मेडिक्लेम योजना,स्वतंत्र घरकुल योजना, मध्यान्ह भोजन योजना बंद करून बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी. यासह बांधकाम कामगारांना दिवाळीमध्ये दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर मृत्यु झाल्यास त्याला टू ए फाईव्ह सिक्स या योजनेचा लाभ मिळावा. आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांसह बांधकाम कामगार सहभागी होते. गेल्या अनेक वर्षापासून या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याने आज हा इशारा मोर्चा काढत असल्याचे गुणवंत नागटिळे यांनी म्हटले आहे. तसेच येत्या एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा- FIR against Nupur Sharma : वादग्रस्त विधान प्रकरणी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा, पुढील तपास सुरू - वळसे पाटील