कोल्हापूर : विकेंड लॉकडाऊनमुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांची वर्दळ रस्त्यावर आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी...तर ड्रोन कॅमेरामधून ही दृश्य टिपली आहेत तौफिक मिरशिकारी यांनी.
कोल्हापुरातील विकेंड लॉकडाऊनच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम जाणवला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर नेहमी प्रचंड गर्दी असते. मात्र आजची स्थिती पाहता केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक, भाजीपाला वाहतूक आणि औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकातून पुण्याकडे जाणारी वाहतूक किंवा पुण्याकडून कर्नाटककडे येणारी वाहतूक बहुतांश कमी झाली आहे. कोल्हापूरचे प्रवेशद्वार असणाऱ्या तावडे हॉटेल परिसरात देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे केवळ परवानगी आहे, अशा वाहनांना प्रवेश दिला जात आहे.