कोल्हापूर - भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. काँग्रेसने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. पाकिस्तानचा आतंकवाद संपवण्याचा प्लॅन आहे. पाकला धडा शिकवण्याचे काम भारत अमेरिका करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आततायी पणा करणे चुकीचे आहे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. शिवाय डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत, आणि मी त्या पार्टीचा अध्यक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली. नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाण काही हालचाल असेल, पण हे सरकार कधी पडेल सांगता येत नाही. तीन पक्षात अजून एकमत नसून ते एकमेकांविरोधात विधान करत आहेत. त्यामुळं सरकार फारकाळ टिकेल असं वाटत नाही, असे विधान सुद्धा रामदास आठवले यांनी केले.