ETV Bharat / city

राजर्षी शाहू जयंतीसाठी करवीरनगरी सजली; कोरोना निर्बंध पाळून साजरा होणार सोहळा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. त्यामुळे २६ जून हा शाहू महाराजांचा जयंतीचा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा करवीर नगरीत मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून जयंती साजरी केली जाणार आहे. विविध संघटनांच्या वतीने शाहू जयंती साजरी केली जाणार आहे.

राजर्षी शाहू जयंतीसाठी करवीरनगरी सजली
राजर्षी शाहू जयंतीसाठी करवीरनगरी सजली
author img

By

Published : Jun 25, 2021, 11:18 AM IST

कोल्हापूर- लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर नगरी सजली आहे. शनिवारी होणाऱ्या (२६जून) जयंतीनिमित्त शहरातील स्मारके विद्युत रोषणाईने सजली आहेत. तसेच करवीरकरांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यंदाची शाहू जयंतीही कोरोना निर्बंध पाळून साजरी करण्याची तयारी दाखवली आहे. विविध संघटनांनी आणि संस्थांनी शाहू पुरस्कार वितरणाचे सोहळे आयोजित केले आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. त्यामुळे २६ जून हा शाहू महाराजांचा जयंतीचा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा करवीर नगरीत मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून जयंती साजरी केली जाणार आहे. विविध संघटनांच्या वतीने शाहू जयंती साजरी केली जाणार आहे.

लोकराजा छत्रपती राजश्री शाहू प्रतिष्ठान तर्फे पुरस्काराची घोषणा-

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोक राजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान यांच्या वतीने समाजात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा लोक राजा राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्ष हा समारंभ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाही कोरोनाचे नियम पाळून या पुरस्काराचा वितरण होणार आहे. यंदाचा पुरस्कार लोक राजा राजर्षी शाहू या मालिकेचे लेखक अभ्यासक डॉ. रमेश जाधव आणि कोविड काळात शववाहिका चालक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेली कुमारी प्रिया पाटील यांना यंदाचा लोक राजा राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा बिंदू चौक येथे पार पडणार आहे.

जिल्हा परिषद यांच्याकडून शाहू पुरस्काराची घोषणा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाहू पूरस्काराची घोषणा माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केली. सदस्य शिल्पा पाटील, विनय पाटील, शिवानी भोसले, विशांत महापुरे, विजय भोजे, कल्पना चौगुले आणि कागल पंचायत समितीच्या सभापती पूनम मधून यांना शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठात डॉ. जयसिंगराव पवार यांची व्याख्यान

शाहू जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन होईल. त्यानंतर शिव वार्ता या यूट्यूब वाहिनीवरून डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे व्याख्यान होईल अशी माहिती कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी दिली.

मराठा महासंघातर्फे लेख मालाचे आयोजन

शाहू जयंती निमित्त मराठा महासंघ यांच्या वतीने देखील जोरदार तयारी केली आहे. यंदाची शाहू जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी घेतला आहे. याअंतर्गत राजर्षी शाहू लेखमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.