कोल्हापूर - विनामास्क फिरणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. आज शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी फौज उभी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार 'ब्रेक दि चेन' या नियमानुसार कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना नियम पायदळी तुडवणाऱ्यावर आता पोलीस कारवाई करणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हा पोलीस प्रशासन कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. कोरोना नियमांना हरताळ फासणाऱ्या नागरिकांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. विनामास्क शहरात फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे काम सुरू केले आहे. आज शहरात दसरा चौक, सायबर चौक, कावळा नाका, शिवाजी पूल, रंकाळा स्टँड परिसरात पोलिसांनी कारवाईला सुरवात केली.
आज दुपारपासून कोल्हापूरातील दुकाने बंद -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. त्याला कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सने विरोध दर्शविला होता. ५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यात संघटनेची बैठक झाली. दरम्यान आज संघटनेची बैठक जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्यासोबत झाली. त्यामध्ये आज व्यापारी आस्थापने दुपारी ३ वाजेनंतर बंद ठेवून सहकार्य करावे, असे सांगितले आवाहन जिल्हा पोलिस प्रमुखांनी केली आहे. तर, उद्या ७ एप्रिल रोजी सकाळी प्रशासनाच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल, त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
हेही वाचा - शेजारील राज्यातूनही रुग्ण येत असल्याने नागपुरात बेड मिळण्यास अडचणी