ETV Bharat / city

पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया कराडमध्येच उतरले; राष्ट्रवादी-भाजप संघर्ष टळला - karad paolice

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर किरीट सोमैय्या आज(सोमवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत होते. कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणार असा पवित्रा घेत सोमैया यांनी घेतला आहे. त्यामुळे ते कोल्हापूरला येत होते. मात्र रविवारी रात्री कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना जिल्हा बंदी केल्याबाबतची नोटीस काढली. शिवाय कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा रात्रीच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैय्या कराडमध्येच उतरले आहेत. परिणामी राष्ट्रवादी-भाजप संघर्ष टळला

पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया कराडमध्येच उतरले

author img

By

Published : Sep 20, 2021, 9:03 AM IST

कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर किरीट सौमैया कोल्हापूरला यायला निघाले होते. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या अखेर कराड येथेच उतरले आहेत. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते आज पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड स्थानकात उतरले आहेत. माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असा पवित्रा सोमैया यांनी घेतला. त्यामुळे आता कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे, शिवाय राष्ट्रवादीचा मोर्चा सुद्धा आता रद्द झाला आहे.

पुन्हा कोल्हापूरला येणार - सोमैया

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर किरीट सोमैय्या आज(सोमवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत होते. कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणार असा पवित्रा घेत सोमैया यांनी घेतला आहे. त्यामुळे ते कोल्हापूरला येत होते. मात्र रविवारी रात्री कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना जिल्हा बंदी केल्याबाबतची नोटीस काढली. शिवाय कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा रात्रीच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू होती. त्यांचे आमच्या स्टाईलने स्वागत करू असा इशारा सुद्धा दिला होता. या संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर सोमैया कराड येथे पहाटे उतरले आहेत.

रेल्वेतून उतरल्यानंतर सोमैया सध्या कराड मधील शासकीय विश्रामगृह येथे थांबले आहेत. मात्र यावेळी त्यांनी पुन्हा दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार आणि हा घोटाळा बाहेर काढणारच, असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, यामुळे आता राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि भाजपमधील संघर्ष तुर्तास तरी टळला आहे. मात्र किरीट सोमैया यांच्या कोल्हापूरच्या दौऱ्याच्या ठाम भूमिकेमुळे हा वाद एवढ्यावरच मिटणार की आणखी काही वेगळे वळण लागणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण-

भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती घेऊन घोट्याळ्याचा खुलासा करण्यासाठी किरीट सोमैया यांनी कोल्हापूरला जाण्याचे निश्चित केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमैय्यांच्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमैया यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस पाठवली. तरीही सोमैया हे रविवारी रात्री सीएसटीएम स्थानकातून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे निघाले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ

हेही वाचा - पोलिसांनी मला चार तास घरी डांबून ठेवलं - किरीट सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.