ETV Bharat / city

कोल्हापूरच्या कडकनाथ घोटाळा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल - kadaknath fraud sangali

जवळपास ५०० कोटींच्या कडकनाथ घोटाळ्यात महारयत ऍग्रो कंपनीचे संचालक सुधीर व संदीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक शेतकरी तक्रार घेऊन पुढे येत आहेत.

कडकनाथ घोटाळ्यातील महारयत ऍग्रो कंपनीचे संचालक सुधीर व संदीप मोहिते यांच्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
author img

By

Published : Aug 30, 2019, 10:36 AM IST

कोल्हापूर - सांगलीच्या कडकनाथ घोटाळा प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात 3 कोटी 49 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ५०० कोटींच्या या घोटाळ्यात महारयत ऍग्रो कंपनीचे संचालक सुधीर व संदीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक शेतकरी तक्रार घेऊन पुढे येत आहेत.

संबंधित कंपनीने सांगलीसह सातारा व कोल्हापूरमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा : ETV ETV ETV 'कडकनाथ' स्कीममध्ये सांगलीत मोठा घोळ; ५०० कोटींची फसवणूक

सुधीर मोहिते व संदीप मोहिते यांनी महारयत ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालनाची योजना सुरू केली. योजनेत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 8 हजारांवर शेतकरी व बेरोजगार तरुणांनी सुमारे 500 कोटींच्या आसपास गुंतवणूक केली होती. मात्र, कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील त्यांच्या कार्यालयांना टाळे लावून धूम ठोकली.

अवघ्या 75 हजार रुपयात लाखोंची कमाई होत असल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये गुंतवणूक केली. मात्र, आता या कंपनीने हा गोरखधंदा गुंडाळत पोबारा केल्याने सर्व गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत.

Intro:कोल्हापूर ब्रेकिंग

कोल्हापूर कडकनाथ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

शाहूपुरी पोलीस ठाण्यात 3 कोटी 49 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल

दोघेही महारयत ऍग्रो इंडिया कंपनीचे संचालक

तक्रार घेऊन अनेक शेतकरी सुद्धा येतायेत पुढे

कंपनीने कोल्हापूरसह सांगली सातारा मध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याच्या तक्रारी
Body:(काल कडकनाथ घोटाळा पॅकेज पाठवले आहे चेक करा)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.