कोल्हापूर : देशभरात नागाची अनेक मंदिरे आपण पाहिली आणि ऐकली आहेत. मात्र, कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील एकोंडी गावात एक असे मंदिर आहे. जिथे नाग आणि नागीण दोन्ही एकत्र असलेले मंदिर आहेत. "श्री नागनाथ देवालय" म्हणून हे मंदिर ओळखले जाते. भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी शंकर पार्वतीने घेतलेल्या ईच्छापुर्ती नाग नागिनीच्या स्वयंभू रूपातील दर्शन देणारे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे, असे इथले पुजारी पांडुरंग गुरव यांनी म्हटले आहे. आज नागपंचमी निमित्ताने सकाळपासूनच याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच आज सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - Milk feeding to Snake : नागपंचमीला नागाला दूध पाजताय? मग ही बातमी एकदा वाचाच...
राहुल गांधी सुद्धा येऊन गेल्याची पुजाऱ्यांची माहिती : संपूर्ण कागल तालुक्यात ओळखले जाणारे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या या मंदिरात अनेक भाविक येत असतात. नागपंचमी दिवशी तर भाविक प्रचंड गर्दी करतात. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा या गावात आणि इथल्या मंदिरात दर्शन घेऊन गेल्याचे इथले पुजारी पांडुरंग गुरव यांनी म्हटले आहे.