कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत 388 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 746 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 390 इतकी झाली आहे.
हेही वाचा-हनिमून टूर पॅकेजमध्ये निघाले चरस; नवविवाहित जोडपे थेट कतारच्या तुरुंगात!
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 390 वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 807 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. बुधवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 746 वर पोहोचली आहे. कोरोनाने एकूण मृतांची संख्या 1 हजार 837 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले असल्याने चिंतेची बाब ठरत आहे.
हेही वाचा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : यंदाही चैत्यभूमी परिसर रिकामा
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
- 1 वर्षाखालील - 66 रुग्ण
- 1 ते 10 वर्ष - 2033 रुग्ण
- 11 ते 20 वर्ष - 3851 रुग्ण
- 21 ते 50 वर्ष - 29602 रुग्ण
- 51 ते 70 वर्ष -15829 रुग्ण
- 71 वर्षांवरील - 4009 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 55 हजार 390 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 980
2) भुदरगड - 1,337
3) चंदगड - 1,263
4) गडहिंग्लज - 1,684
5) गगनबावडा - 161
6) हातकणंगले - 5,626
7) कागल - 1,765
8) करवीर - 6,200
9) पन्हाळा - 2,002
10) राधानगरी - 1,326
11) शाहूवाडी - 1,423
12) शिरोळ - 2,644
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8,157
14) कोल्हापुर महानगरपालिका - 17,931
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2,891