ETV Bharat / city

कहर कोरोनाचा : कोल्हापुरात बुधवारी दिवसभरात 114 नवे रुग्ण - kolhapur corona reports

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 1515 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 898 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 580 झाली आहे.

corona
कोल्हापूर
author img

By

Published : Jul 16, 2020, 1:06 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 114 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कसबा बावडा येथील एका 60 वर्षांच्या वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापुरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. केवळ 34 रुग्ण उरले असताना अचानक रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली ती आता 580 वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 1515 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 898 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 580 झाली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभरात कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजेच 35 रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ चंदगड तालुक्यात 20 रुग्ण आढळले आहेत. तर, करवीर तालुक्यात सुद्धा बुधवारी दिवसभरात 19 रुग्ण आढळले आहेत. नगरपालिका क्षेत्रातसुद्धा दिवसभरात 20 रुग्ण आढळले आहेत.

  • आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

    आजरा- 97
    भुदरगड- 81
    चंदगड- 181
    गडहिंग्लज- 135
    गगनबावडा- 7
    हातकणंगले- 42
    कागल- 62
    करवीर- 118
    पन्हाळा- 54
    राधानगरी- 75
    शाहूवाडी- 195
    शिरोळ- 34
    नगरपरिषद क्षेत्र- 227
    कोल्हापूर महापालिका क्षेत्र-176
    असे एकूण 1394
    इतर जिल्हा व राज्यातील 31 असे मिळून एकूण 1515 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

    जिल्ह्यातील एकूण 1515 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 898 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 37 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 580 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.