कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर, सातार या जिल्ह्याचे महापुराने प्रंचड नुकसान केले. या जिल्ह्यातील लोकांना वाचवण्यासाठी कोस्टगार्डची टीम या तीनही जिल्ह्यात कार्यरत आहे. याठीकाणी आद्यापही बचाव कार्य सुरु आहे. यामुळे रक्षाबंधनचा सण तोडावर आला असताना या जवानांना आपल्या घरी जाता येणार नाही. हीच खंत त्यांनी अंबाबाईच्या दर्शनाला आले असताना ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीकडे बोलून दाखवली. जवानांचा हा संवाद तिथे उपस्थीत असलेल्या काही महिलांनी ऐकला आणि त्या तत्काळ मंदिरा बाहेर जाऊन राख्या घेऊन आल्या. दर्शनासाठी आलेल्या जवानांना त्यांनी राखी बांधली. महापुरातील माणुसकीचा हा आनोखा सोहळा जवानांचे रक्षाबंधन ईटीव्ही भारतच्या साक्षीने साजरे झाले.
कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला होता. यामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा या नंद्याना महापूर आला आणि हे तिनही जिल्हे पूर बाधीत झाले. या वेळी कोस्टगार्ड, संरक्षण दल आणि स्थानिक संस्था बचाव कार्य करत होत्या. या मदत कार्यात कोस्टगार्डने मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावली. मदत कार्य पूर्ण झाल्यानंतर कोस्टगार्डचे जवान आंबाबाईच्या दर्शासाठी आले होते. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिधीशी बोलताना त्यांनी रक्षाबंधनसाठी गावी जाता येणार नसल्याची खंत व्यक्त केली. हे दर्शनासाठी आलेल्या महीलांनी आएकले आणी त्यानी या जवानांना राखी बांधून त्याचे रक्षा बंधन साजरे केले. यामुळे जवानांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, आणि महापुरातील माणुसकीचे दर्शन कोल्हापुरात झाले.