ETV Bharat / city

Nitesh Rane in Kolhapur : वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल - नितेश राणे सीपीआर रुग्णालयात

आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी (Nitesh Rane Health Checkup) कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital Kolhapur) आणण्यात आले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात नितेश राणे यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

nitesh rane in kolhapur
नितेश राणे वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात
author img

By

Published : Feb 7, 2022, 4:55 PM IST

Updated : Feb 7, 2022, 5:20 PM IST

कोल्हापूर - आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी (Nitesh Rane Health Checkup) कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital Kolhapur) आणण्यात आले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात नितेश राणे यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack case) नितेश राणे यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले होते.

नितेश राणे यांना सीपीआर रुग्णालयात आणताना

सुरुवातीला नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती जास्त खराब झाली. तसेच त्यांना पाठीचा आणि मानेचा तसेच छातीचा त्रास होत असल्याने नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सीपीआरमध्ये सुरू झाली आहे.

  • CPR रुग्णालयात तपासणी सुरू -

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी आमदार राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. जामिनावर आज सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, लता मंगेशकर यांच्या निधन झाल्याने 2 दिवस दुखवटा आणि सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आज न्यायालयास सुट्टी असल्याने ही सुनावणी मंगळवारी गेली आहे. दरम्यान, नितेश राणे यांना पाठीचा मानेचा आणि छातीचा त्रास होत असल्याने त्यांना आज कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.

  • काय आहे प्रकरण?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणूक सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

Last Updated : Feb 7, 2022, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.