ETV Bharat / city

KDCCB President Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मुश्रीफ; उपाध्यक्षपदी तर राजू आवळे - हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बॅंक अध्यक्ष

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( KDCCB President Election ) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Miniter Hasan Mushrif KDCCB President ) यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे ( Raju Awale KDCCB Vice-President ) यांची निवड झाली आहे.

KDCCB President Election Update
KDCCB President Election Update
author img

By

Published : Jan 20, 2022, 6:35 PM IST

Updated : Jan 20, 2022, 7:27 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( KDCCB President Election ) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Miniter Hasan Mushrif KDCCB President ) यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे ( Raju Awale KDCCB Vice-President ) यांची निवड झाली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी निवडणुकीपूर्वी आयोजित बैठकीनंतर ही माहिती दिली. शिवाय सर्वच संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाने पुन्हा एकदा बँक कशा पद्धतीने देशात नंबर एकची बँक करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी माध्यमांना दिली.

प्रतिक्रिया

'शिवसेनेचा आज काही मुद्दाच नव्हता' -

सत्ताधारी गटाच्या विरोधात जाऊन पॅनेल उभे करत 3 जागांवर विजय मिळविणाऱ्या शिवसेनेने आपल्याला सन्मान मिळावा, अशी भूमिका मांडली होती. सत्ताधारी गटाकडून तसेच आमच्या शिवसेनेकडून निवडणून आलेले एकूण 5 संचालक होते. त्यामुळे स्वतः खासदार संजय मंडलिक यांनी याबाबत आपली भूमिका व्यक्त करत सन्मान मिळावा बोलले होते. मात्र, आजच्या निवडीमध्ये शिवसेनेचा काही मुद्दाच नव्हता, असे मुश्रीफ यांनी म्हटले. आम्ही सत्ताधारी गटाचे 18 जणांनी मिळून निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी म्हटले. शिवाय विनय कोरे नाराज नाहीत, तेच सूचक होते. मात्र, त्यांनी आपल्या भावना आमच्यासमोर व्यक्त केल्या आणि मन मोकळे केले, असेही मुश्रीफ म्हणाले.

सतेज पाटलांनी केले अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन -

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडूण आलेल्या अध्यक्ष हसन मुश्रीफ तसेच उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांचे अभिनंदन केले. तसेच यापुढे बँकेत अधिक चांगल्या पद्धतीने काम कसे करता येईल, याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर

Last Updated : Jan 20, 2022, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.