कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांनी थोडा अभ्यास करावा दंड राज्य सरकार ने केले नसून केंद्र सरकारने तयार केलेल्या मोटार व्हेइकल ॲक्टनुसार केलेले आहे, असा टोला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांना लगावला आहे.
ते कोल्हापुरात बोलत होते. अनेक वेळा नागरिकांकडून वाहन नोंदणीच्या ( Vehicle Registration ) वेळी देण्यात आलेला मोबाइल नंबर चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नियम मोडल्यास जाणारा मेसेज हा चुकीच्या नंबरवर जात असल्याने नेमका किती दंड लागला आहे, हे लोकांना कळत नाही. म्हणून परिवहन मंत्री म्हणून मी एक बैठक घेणार असून रजिस्ट्रेशन मोबाइल नंबर हे अपडेट करण्याची मोहीम सुरू करणार असल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.