ETV Bharat / city

आरोग्य राज्यमंत्र्याकडून कोविड नियम पायदळी; विना मास्क आनंदोत्सव साजरा केला, नेटकरी म्हणाले... - कोरोना नियम पायदळी राजेंद्र यड्रावकर

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, आरोग्य मंत्री राजेश टोपे दररोज माध्यमांसमोर येऊन कोरोना नियमांचे पालन करा, असे वारंवार आवाहन करत आहेत. असे असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकरकडूनच नियम पायदळी तुडविल्याचे पाहायला मिळाले.

Rajendra Yadravkar broke corona rules
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर
author img

By

Published : Jan 8, 2022, 10:43 PM IST

कोल्हापूर - एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने लॉकडाऊनची घोषणा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, आरोग्य मंत्री राजेश टोपे दररोज माध्यमांसमोर येऊन कोरोना नियमांचे पालन करा, असे वारंवार आवाहन करत आहेत. असे असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकरकडूनच नियम पायदळी तुडविल्याचे पाहायला मिळाले.

आनंदोत्सव साजरा करताना कार्यकर्ते

हेही वाचा - माहिती घेऊन आमदार कोरे यांच्या आरोपांवर उत्तर देणार - मंत्री हसन मुश्रीफ

नुकतीच कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. यावेळी विना मास्क शेकडो कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करताना ते दिसले. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. जिल्ह्यात अनेक नेत्यांकडून अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाले आहे.

काय म्हटले आहे नेटकऱ्यांनी ?

  • हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे बेजबाबदार मंत्री कोरोना ने डोकं वर काढलं असताना. विनामास्क इतक्या लोकांना जमवून जल्लोष कितपत योग्य आणि हेच उद्या लॉकडाऊन ही लावणार आणि सर्वसामान्य लोकांना जबाबदार धरणार तुमच्याकडून दंड ही वसूल करणार. #कोल्हापूर #वसुलीसरकार @TUSHARKHARE14 @Coolkiranj pic.twitter.com/pJCtP1m8H0

    — आकाश शिखरे .. (@Akashshikhare9) January 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

1) हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे बेजबाबदार मंत्री कोरोनाने डोके वर काढले असताना विनामास्क इतक्या लोकांना जमवून जल्लोष करत आहेत. हे कितपत योग्य आहे? हेच उद्या लॉकडाऊनही लावणार आणि सर्वसामान्य लोकांना जबाबदार धरणार. तसेच, तुमच्याकडून दंडही वसूल करणार.

2) यांनी अशी गर्दी करायची आणि विद्यार्थ्यांचे कॉलेज बंद ठेवायचे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ!

3) राज्य आरोग्यमंत्री आहेत ते, त्यांना कोरोना होत नसतो. कार्यकर्त्यांनी कोरोना कधीच चिरडून मारला.

4) हे एकटेच नाहीत, सर्वच नेत्यांना कोरोनाचा विसर पडलेला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक झाली आता जिल्ह्यात कोरोना नक्की वाढेल.

5) आरोग्य राज्यमंत्री आहेत ते, त्यांना कारोना कसा होईल? त्यांना करोना घाबरतो म्हणून तर, ते मास्क घालत नाहीत आणि विजयी जल्लोष करतात. खूप छान चाललंय.

अनेक नेत्यांकडून जिल्हा बँक निवडणुकीनंतर विजयी मिरवणूक

नेत्यांच्या कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेक पोस्ट व्हॉट्सअॅपवर सुद्धा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नेत्यांकडून अशा पद्धतीने जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष झाला. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलेच संतापले आहेत. काहींनी तर जेसीबीमधून गुलाल उधळल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - Kolhapur Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचे 4 नवे रुग्ण; महापालिकेतर्फे उपयोजना सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.