ETV Bharat / city

Minister Hasan Mushrif - बॅगा भरा, सहलीला जा, आपला सांताक्लॉज आहे; हसन मुश्रीफ यांचे मिश्किल वक्तव्य - Hasan Mushrif on Santa Claus

कोरोनाच्या काळात आपण सर्वजण कंटाळले असाल. त्यामुळे, बॅगा भरा आणि एखादा दौरा निवडून सहिलीला जा, बाकीचा कसला विचार करू नका, त्यासाठी आपला सांताक्लॉज आहे, असे मिश्किल वक्तव्य आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी केले.

Santa Claus comment Hasan Mushrif
सांताक्लॉज वक्तव्य हसन मुश्रीफ
author img

By

Published : Nov 18, 2021, 7:18 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या काळात आपण सर्वजण कंटाळले असाल. त्यामुळे, बॅगा भरा आणि एखादा दौरा निवडून सहिलीला जा, बाकीचा कसला विचार करू नका, त्यासाठी आपला सांताक्लॉज आहे, असे मिश्किल वक्तव्य आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी केले. विधानपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक घडामोडींना वेग आला आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील (Minister Satej Patil) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलले.

बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक : सतेज पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले...

मतदानापूर्वी मतदारांना सहलीवर पाठविण्याच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांचे मिश्किल वक्तव्य

यावेळी बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सतेज पाटील मेळावा नको, असे म्हणत होते. मात्र मीच म्हणालो मेळावा घ्यायला पाहिजे. आपण सर्वजण एकत्र आहे, हे दाखवण्यासाठी हा मेळावा आहे. कोरोनामुळे तुम्ही सर्वजण कंटाळले असणार. तुमच्या घरचे सुद्धा कंटाळले असणार. त्यामुळे, श्रमपरिहार म्हणून तुम्ही आता एखादा दौरा आयोजित करा आणि बॅगा भरा. शिवाय इतर कोणताही विचार करू नका, त्यासाठी आपला सांताक्लॉज आहे, असेही मुश्रीफ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या मतदारांना संबोधित करताना म्हणाले. त्यांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, तुम्ही सर्वजण सहलीला रवाना झाला की, आम्ही इकडे निवांत होऊ, असेही म्हणत कोणत्याही परिस्थितीत सतेज पाटलांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

उदय सामंत यांनी सतेज पाटलांना का म्हटले 'सांताक्लॉज'?

यावेळी सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सुद्धा ते सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना संबोधताना ते म्हणाले, सतेज पाटील हे विजयी होणार, यात कोणतीही शंका नाही. शिवसेनेचे सुद्धा एकही मत दुसरीकडे पडणार नाही, याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. शिवाय सतेज पाटील 280 मतांचा दावा करत आहेत, मात्र त्याहून अधिक मते त्यांना मिळतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ते खूप हुशार असून त्यांनी एक वर्षापासून या निवडणुकीची तयारी केली आहे. शिवाय नुसतीच तयारी नाही तर, त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे, त्याच्या जोरावरच ते विजयी होतील.

सतेज पाटलांनी दाढी का वाढवली, हा विचार करत होतो, पण ते आता समजले. कारण त्यांनी सांताक्लॉजसारखी दाढी वाढवली आहे. सांता म्हणजे 'इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती' आणि सतेज पाटलांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून अनेकांची इच्छा पूर्ण केली आहे. अनेकांना विकासकामांसाठी निधी दिला आहे, असे सामंत म्हणाले. यापुढे त्यांना कामाची संधी मिळावी यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडणून द्यावे, असे आवाहनही सामंत यांनी केले. दरम्यान, हाच धागा पकडत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यांच्या भाषणात सतेज पाटलांना सांताक्लॉज म्हणत मिश्किल वक्तव्य केले.

हेही वाचा - महाविकास आघाडी २५ वर्ष टिकेल; त्या पत्रातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.