ETV Bharat / city

First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक - First Transgender Corporator In Kolhapur

संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली आहे. कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. तातोबा बाबूराव हांडे ( Tatoba Baburao Hande ) असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवकाचे नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने त्यांना हा हांडे यांना हा बहूमान दिला आहे.

तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक
तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक
author img

By

Published : Jul 22, 2022, 12:17 PM IST

Updated : Jul 23, 2022, 6:51 PM IST

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो असे वक्तव्य केले होते मात्र प्रत्यक्षात राजकारणात असे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले नाही. राजकारणामध्ये नेहमीच तृतीयपंथी यांना संघर्ष करावा लागला आहे. मात्र संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत (Hupari Nagar Parishad) घडली आहे, कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले (First Transgender Corporator In Kolhapur) आहे. तातोबा बाबूराव हांडे (Tatoba Baburao Hande) असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवक चे नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने (Tararani Aghadi) त्यांना हा हांडे यांना हा बहुमान दिला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.

हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

2017 साली झालेल्या निवडणुकीत छाननी मध्ये अर्ज बाद झाला : दरम्यान, हुपरी मधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या तृतीयपंथी तातोबा हांडे यांना मानणारा मोठा वर्ग गावात आहे. आजपर्यंत जोगवा मागून, कार्यक्रम करून त्यांनी आपले आयुष्य घालवले आहे. मात्र आता ते थेट नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून पोहोचले आहेत. खरंतर हुपरी मध्ये नगरपरिषदेची मान्यता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका जाहीर झाल्या. यामध्ये आमदार प्रकाश आवडे यांच्या ताराराणी आघाडीकडून तातोबा हांडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक गोष्टीमुळे हांडे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरला. मात्र त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी शब्द दिला होता की, सत्ता आल्यानंतर आपण हांडे यांना स्वीकृत नगरसेवक करणार. त्यामुळे आता प्रकाश बावचे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आमदार प्रकाश आवडे तसेच राहुल आवडे यांनी हांडे यांना स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्यांचा सन्मान केला. राज्यात तर आजपर्यंत असा निर्णय घेतला गेला नाहीच पण देशभरात सुद्धा आशा पद्धतीने कुठे निर्णय घेतला गेला नसल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक निवडीनंतर स्वतः ताराराणी पक्षाचे नेते राहुल आवाडे यांनी तातोबा हांडे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवाय त्यांच्या हातून यापुढे मोठ्या प्रमाणात समाजकार्य घडावे आशा शुभेच्छा सुद्धा दिल्या.

आम्हाला कुठे सन्मान मिळतो ? मात्र आता मोठा सन्मान, लोकांची सेवा करणार : आत्तापर्यंत कोणीही आम्हाला सन्मान दिला नाही. आम्हाला सुद्धा पोट आहे, जोगवा मागूनच आम्ही आत्तापर्यंत जगत आलो आहे. या दुकानात माग त्या दुकानात माग असे करतच आयुष्य काढले आहे. आमच्या लोकांकडे सुद्धा सरकारने पाहिले पाहिजे, लक्ष दिले पाहिजे आणि आमचे प्रश्न सोडवले पाहिजे असे नूतन स्वीकृत नगरसेवक तातोबा हांडे यांनी म्हंटले आहे. मात्र आता जी मला संधी मिळाली आहे, त्यामाध्यमातून नक्कीच लोकांची सेवा करेन असाही विश्वास त्यांनी नागरिकांना दिला आहे.

देशाला आदर्श घालून देणारी घटना : दरम्यान, समाजात तृतीयपंथी नेहमीच उपेक्षित असलेला वर्ग आहे. कोणी नोकरी देत नाही की कोणी सन्मानाचा वागणूक देत नाही. त्यामुळे अनेकजण जोगवा मागूनच आपले आयुष्य काढत आहेत. मात्र या सगळ्याला फाटा देत हुपरी नगरपरिषदेने क्रांतिकारी पाऊल टाकले आणि तृतीयपंथी तातोबा हांडे यांना स्वीकृत नगरसेवक केले. इतर व्यक्तींप्रमाणे यांना सुद्धा समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी हा मोठा आणि आदर्शवत असा निर्णय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मधील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला होता. आता हुपरी नगरपरिषदेने सुद्धा घेतलेला निर्णय राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा आहे. याचे अनेकांनी अनुकरण करण्याची गरज आहे.

हेही वाचा - Mission 200 Incomplete : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 अपूर्ण, चंद्रकांत पाटलांचाही दावा ठरला फोल

Last Updated : Jul 23, 2022, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.