ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : कोल्हापुरात राडा! राजेश क्षीरसागरांचे पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले - कोल्हापुरात शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागरांचे पोस्टर्स फाडले

'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है' च्या घोषणा देत शिवसैनिकांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे शहरातील विविध ठिकाणचे पोस्टर्स ( Rajesh Kshirsagar Posters Down By Shivsainiks In Kolhapur ) फाडले.

Rajesh Kshirsagar Posters Down By Shivsainiks

author img

By

Published : Jun 25, 2022, 3:10 PM IST

कोल्हापूर - 'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है' च्या घोषणा देत शिवसैनिकांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे शहरातील विविध ठिकाणचे पोस्टर्स फाडले. तर, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या पोस्टर्सवरील केवळ क्षीरसागर यांचे फोटो फाडण्यात आले आहे. माजी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले ( Rajesh Kshirsagar Posters Down By Shivsainiks In Kolhapur ) आहे.

राजेश क्षीरसागरांचे पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले

शिवसैनिक आक्रमक - यावेळी शिवसैनिक म्हणाले की, क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाच्या नावावर ते मोठे झाले आहेत. पक्षाने मंत्रीपद दिले, कार्यालय, वैभव दिले. इतके सर्व देऊनही त्यांची भूक मिटलेली नाही. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा अहंकार जिरवू व पक्षाच्या नावावर मोठे झालेल्यांना धडा शिकवू, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर कोल्हापूर होते. मातोश्री आपले मंदिर आहे आणि उद्धव ठाकरे दैवत आहे म्हणत होते. मात्र, त्याच रात्री ते शिंदे यांना जाऊन मिळाले आणि गुवाहाटीकडे रवाना झाले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल; निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.