कोल्हापूर: कोल्हापूरचा शाही दसरा kolhapur Dasara छत्रपती घराण्याचा मान, परंपरा कायम ठेवून, शाहू महाराज यांच्या मान्यतेनुसारच आणि शासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच शाहू महाराज यांच्याशी चर्चा करून या सोहळ्याचा आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर guardian minister deepak kesarkar म्हणाले आहेत.
ते कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात Kolhapur District Collector Office झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव ग्रँड इव्हेंट म्हणून साजरा करुन देश विदेशात पोहोचण्यासाठी प्रयत्न करुया, असे सांगून या महोत्सवासाठी शासनाच्यावतीने २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारकडून हा सोहळा 'स्टेट इव्हेंट' म्हणून साजरा पालकमंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पदभार स्वीकारत प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामे आणि दसरा महोत्सव याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची बैठक घेतली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळा हा राज्यात प्रसिद्ध आहे. हा दसरा देशपातळीवर कसा जाईल, त्यातून पर्यटन विकास कसा होईल, यादृष्टीने राज्य सरकारकडून हा सोहळा 'स्टेट इव्हेंट' म्हणून साजरा केला जाईल. मात्र साध्या शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी कमी कालावधी असला, तरी देखील विविध उपक्रमांची व्यापक प्रसिध्दी व सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शाही दसरा महोत्सव हे देशातील एक आकर्षण ठरुन देश विदेशातील नागरिकांनी या शाही दसरा महोत्सवाला भेट द्यावी, अशा पध्दतीने हा महोत्सव साजरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.
कोल्हापूर शहराचा 'हेरिटेज सिटी' म्हणून विकास साधण्यावर भर कोल्हापूर हा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण जिल्हा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश देत कृषी, उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास साधला आहे. या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल. जुना राजवाडा, शालिनी पॅलेससह शहरातील मुख्य रस्त्यांलगतच्या हेरिटेज वास्तूंचे जतन होण्यासाठी नियोजन करा. शाहू मिलचा विकास, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, पर्यटन क्षेत्र, कृषी, उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती व विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन चर्चा विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे ही पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेतून 25 लाखांचा निधी कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचण्यासाठी हा महोत्सव भव्य सोहळा (ग्रँड इव्हेंट) म्हणून साजरा करण्यात येईल. यात राज्य शासन सहभागी होईल. असे सांगून यावर्षीच्या दसरा महोत्सवासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.