ETV Bharat / city

Larvae In School Nutrition Meal : कोल्हापुरात शालेय पोषण आहारात सापडल्या अळ्या.. तब्बल बारा हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात - बारा हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या ( Kolhapur Municipal Corporation ) शाळेत मुलांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्या ( Larvae In School Nutrition Meal ) आहेत. या प्रकारामुळे पालकांनीं आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ घालून जाब विचारला आहे.

कोल्हापुरात शालेय पोषण आहारात सापडल्या अळ्या.. तब्बल बारा हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

author img

By

Published : Mar 16, 2022, 4:04 PM IST

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील एका महानगरपालिकेच्या ( Kolhapur Municipal Corporation )शाळेत शालेय पोषण आहारात भातात अळ्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली ( Larvae In School Nutrition Meal ) आहे. अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ( Ahilyabai Holkar Primary School Kolhapur ) ही घटना घडली असून, सदरची बाब सातवीच्या विद्यार्थिनीच्या लक्षात आली. दरम्यान, महापालिकेच्या प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान ज्या ठेकेदारामार्फत हा शालेय पोषण आहाराचा पुरवठा झाला आहे त्याने कोल्हापूर जिल्ह्यातल्या बारा हजार विद्यार्थ्यांना आज आळ्या मिश्रित पोषण आहार दिला गेल्याचं समोर आल आहे. त्यामुळं 12 हजार विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शालेय पोषण आहार चालू होऊन आज दुसराच दिवस असताना ही घटना घडल्याने संतप्त झालेल्या पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ घातला आहे.

कोल्हापुरात शालेय पोषण आहारात सापडल्या अळ्या.. तब्बल बारा हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

विद्यार्थ्यांना दिले आळ्या मिश्रित खिचडी

कोल्हापुरातील महापालिका शाळेमध्ये पोषण आहार दिला जातो. मंगळवार पेठेतील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात बुधवारी खिचडीच्या भातात एका विद्यार्थिनीला अळ्या सापडल्या. तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. याबाबतची माहिती महापालिका अधिकारी आणि पालकांना मिळताच उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विद्या पोळ, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डी.सी कुंभार यांच्यासह तक्रारदार अंजुम देसाई यांनी शाळेत येऊन पाहणी केली. या शाळेतील जेवणाचा ठेका हा मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डी.सी कुंभार यांनी सांगलीच्या नीलाक्षी बचत गट यांना दिला होता. यामुळे कार्यकर्त्यांनी कुंभार यांना धारेवर धरले असून, घटनेचा सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तसेच या प्रकाराची चौकशी महापालिकेच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

पालक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

याप्रकरणी कोल्हापूर शालेय पोषण आहार संघटना आक्रमक झाली आहे. शालेय पोषण आहार संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते अंजुम देसाई यांनी घटनास्थळी भेट घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सर्वांना धारेवर धरले आहे. तसेच हा ठेका तात्काळ रद्द करावा आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी तक्रारदाराने आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे हीच अळी मिश्रित खिचडी जिल्ह्यातल्या अनेक शाळांमधील तब्बल बारा हजार विद्यार्थ्यांना दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला अशी विचारणा केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.