ETV Bharat / city

Satej Patil : कोल्हापूरकरांनी भाजपला योग्य उत्तर दिले : विजयानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Apr 16, 2022, 10:52 PM IST

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी भाजपला योग्य उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडणुकीतील विजयानंतर दिली आहे.

कोल्हापूरकरांनी भाजपला योग्य उत्तर दिले : विजयानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकाल हाती लागले असून, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी 96176 मते मिळवून विजय झाल्या आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला कॉंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या निवासस्थानी तसेच पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे. तसेच यावेळी पालकमंत्री सतेज पाटील ऋतुराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांसमवेत विजयोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी भाजपला योग्य उत्तर दिल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर हा शाहू -फुले- आंबेडकरांचे विचार जपणारा जिल्हा असून, भाजपच्या जातीधर्माचा राजकारणाला बळी न पडता, कोल्हापूरकरांनी शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असल्याच सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरकरांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपला: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले सतेज पाटील यांनी भाजपला कोल्हापूरकरांनी योग्य उत्तर दाखवून दिले असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्हा शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार करणारा जिल्हा असून, येथे भाजपने जाती-धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोल्हापूरकरांनी याला बळी न पडता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आणि त्याच्या वारसांना पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून आम्ही देखील रामनवमी साजरी करतो. मात्र याचा गाजावाजा मी करत नाही. भाजपने केवळ निवडणुका समोर ठेवून रामनवमीचा वापर केला. मात्र कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. ते चुकीच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, हे या निकालातून दाखवून दिले असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

महिलांनबद्दल अपमानास्पद केलेल्या वक्तव्याला महिलांनी दिले उत्तर: माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे निवडणूक चांगलीच रंगली होती. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, माजी खासदार यांनी केलेल्या महिलांबद्दलच्या वक्तव्याला महिलांनीच आता उत्तर दिले असून, छत्रपती ताराराणी यांच्या नगरीतून पहिली महिला आमदार कोल्हापूरकरांनी निवडून दिले आहे. हेच महिलांबद्दल चुकीच्या वक्तव्य करणाऱ्यासाठी महिलांनी दिलेले उत्तर असून, भाजपने माझ्याबद्दल वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेले वक्तव्य तसेच जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा कोल्हापूरकरांनी हाणून पाडला आहे, असे सतेज पाटील म्हटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.