ETV Bharat / city

शिवसेनेला मोठा धक्का बसणार?, कोल्हापुरातील दोन्ही खासदार 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत - संजय मंडलिक एकनाथ शिंदेंना पाठिंबा मराठी बातमी

राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ( CM Eknath Shinde ) पाठिंबा वाढला आहे. त्यात आता कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक ( Mp sanjay Mandlik ) आणि खासदार धैर्यशील माने ( Mp Dhairyasheel Mane ) शिवसेनेला राम राम ठोकत एकनाथ शिंदे गटाला ( Eknath Shinde Group ) पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

dhairyasheel mane sanjay mandlik
dhairyasheel mane sanjay mandlik
author img

By

Published : Jul 17, 2022, 7:40 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक ( Mp sanjay Mandlik ) हे सुद्धा आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हमीदवाडा येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात याबाबत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, संजय मंडलिक यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे ते शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा असताना त्याचे खंडनही करण्यात आलं नाही. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खरा शिवसैनिक कधीही उद्धव ठाकरे यांना सोडून बाजूला जाणार नाही, असे संजय मंडलिक यांनी म्हटलं होते. त्यामुळे खासदार मंडलिक आपल्या शब्दावर ठाण राहणार की शिंदे गटात ( Eknath Shinde Group ) दाखल होणार हे पाहावे लागणार आहे.

हमीदवाडा येथे शिवसनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा - खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा आज ( 17 जुलै ) हमीदवाडा येथे मेळावा पार पडला. यामध्ये संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्यात मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर जायला पाहिजे याबाबत चर्चा झाली. शिवाय कार्यकर्त्यांनी सुद्धा याबाबत जोर लावला. पण, याबाबत अधिकृत निर्णय संजय मंडलिक काय घेणार हे पाहावे लागणार आहे. मंडलिक हे दिल्ली येथे आहेत. दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित नव्हते. मात्र, त्यानंतर कोल्हापूरात पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित होते.

खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांची बैठक

धैर्यशील माने यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा - दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने ( Mp Dhairyasheel Mane ) हे सुद्धा शिंदे गटासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात धैर्यशील माने यांच्याकडून सुद्धा कोणतेच स्पष्टीकरण आलं नाहीये. एकीकडे जिल्ह्यात ते शिंदे गटात जाणार असल्याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी अद्याप मौन पाळलं आहे. त्यांच्या या मौनामुळे अनेकांना ते शिंदे गटात जाणार का?, याबाबत शंका आहे. शिवाय त्यांनी कोल्हापूरातील मेळावा तसेच बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भावना गवळींचा शिवसेनेला धक्का - यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या गटाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे. भावना गवळी यांनी शिंदे गटासोबत जाण्याने यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येतं आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.