कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा ( Kolhapur North by - election ) पोटनिडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी नगरसेवक सुनंदा मोहिते यांच्या मंगळवार पेठ परिसरातील कार्यालयात प्रचार पत्रके, पैशांची पाकिटे सापडल्याने पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ( Action on BJP workers by police in kolhapur ) ताब्यात घेतले. हे पैसे नेमके कोणासाठी आणि मतदारांना वाटण्यासाठी होते का ? याबाबत जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप केल्याने अशोक देसाई, विजय जाधव आणि संतोष माळी यांना ताब्यात घेतले आहे. यावर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडकवण्याचा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on BJP workers kolhapur ) यांनी दिली.
हेही वाचा - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मानाच्या नवीन अश्वाचा फर्स्ट लूक; पाहा व्हिडिओ
सुतारमळा येथे सुद्धा कारवाई : दरम्यान, दसरा चौक येथील सुतारवाडा परिसरातसुद्धा पोलीस, तसेच निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांची पाकिटे मिळाली असून, याचा सुद्धा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कारवाईनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले - महाविकास आघाडीला पराभव दिसू लागल्यामुळे आता आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून 24 तासांसाठी अडकवू पाहत आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्यावर थेट एफआयआर दाखल केले गेले. त्यांच्याकडे काय लाखाचे डबोले सापडले काय? असा सवाल सुद्धा यावेळी पाटील यांनी केला.
एका कार्यकर्त्याच्या घरात घुसून सामान विस्कटले : चंद्रकांत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांच्या, तसेच बूथ एजंट यांच्या जेवणासाठी सोय करत असताना कारवाई केली आहे. एवढेच नाही तर आणखी एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून सामान विस्कटले आहे. तिथे त्यांना काहीच मिळाले नाही. कितीही छळ केलात, तरी आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असे ते म्हणाले.
हेही वाचा - Sadabhau Khot : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे दिशाहीन आणि भरकटलेले : सदाभाऊ खोत