ETV Bharat / city

Kolhapur by-Election : निवडणुकीसाठी मतदान सुरू, अनेक केंद्राबाहेर मतदान सुरू होण्याआधीपासूनच नागरिकांच्या रांगा - kolhapur election

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी ( Kolhapur by-Election ) आज मतदान होत आहे. आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान पार पडणार आहे. मतदानाला सुरुवात झाली असून, कोल्हापुरातील अनेक मतदान केंद्राबाहेर सध्या मतदारांनी रांगा ( People queue Kolhapur North Assembly election voting ) लावायला सुरुवात केली आहे.

Kolhapur North Assembly by-Election
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक मतदान
author img

By

Published : Apr 12, 2022, 9:06 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी ( Kolhapur by-Election ) आज मतदान होत आहे. आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान पार पडणार आहे. मतदानाला सुरुवात झाली असून, कोल्हापुरातील अनेक मतदान केंद्राबाहेर सध्या मतदारांनी रांगा ( People queue Kolhapur North Assembly election voting ) लावायला सुरुवात केली आहे. जवळपास 2 लाख 91 हजार इतके मतदार असून त्यासाठी 357 मतदान केंद्रांवर आज कोल्हापूर उत्तरसाठी मतदान होत आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मानाच्या नवीन अश्वाचा फर्स्ट लूक; पाहा व्हिडिओ

निवडणुकीसाठी 2 हजार 400 हून अधिक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मतदार राजा आज कोणाच्या पारड्यात आपले अमुल्य मत दान करणार हे पाहावे लागणार आहे.

भाजप कार्यकर्त्यांना अटक - कोल्हापूर उत्तर विधानसभा ( Kolhapur North by - election ) पोटनिडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी नगरसेवक सुनंदा मोहिते यांच्या मंगळवार पेठ परिसरातील कार्यालयात प्रचार पत्रके, पैशांची पाकिटे सापडल्याने पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ( Action on BJP workers by police in kolhapur ) काल ताब्यात घेतले. हे पैसे नेमके कोणासाठी आणि मतदारांना वाटण्यासाठी होते का ? याबाबत जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप केल्याने अशोक देसाई, विजय जाधव आणि संतोष माळी यांना ताब्यात घेतले आहे. यावर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडकवण्याचा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on BJP workers kolhapur ) यांनी दिली.

हेही वाचा - Nana Patole Slammed Modi Gov : आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.