ETV Bharat / city

कोल्हापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसात 310 नवे कोरोना रुग्ण; तर 5 जणांचा मृत्यू

1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1,708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1,756 झाली आहे...

Kolhapur Corona update 310 new cases reported in last six days
कोल्हापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसात 310 नवे रुग्ण; तर 5 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 20, 2021, 4:36 AM IST

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 63 नवे रुग्ण आढळले असून, 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात, म्हणजे 15 मार्च ते 19 मार्च पर्यंत एकूण 310 नवे रुग्ण आढळले असून, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर..

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 51 हजार 126 वर पोहोचली आहे. त्यातील 48 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 409 इतकी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1,708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1,756 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे..

  • 1 वर्षाखालील - 57 रुग्ण
  • 1 ते 10 वर्ष - 1,908 रुग्ण
  • 11 ते 20 वर्ष - 3,567 रुग्ण
  • 21 ते 50 वर्ष - 27,130
  • 51 ते 70 वर्ष -14,727
  • 71 वर्षांवरील - 3,737

जिल्ह्यात असे एकूण 51 हजार 126 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे..

  • आजरा - 902
  • भुदरगड - 1,249
  • चंदगड - 1,233
  • गडहिंग्लज - 1,539
  • गगनबावडा - 154
  • हातकणंगले - 5,358
  • कागल - 1,692
  • करवीर - 5,800
  • पन्हाळा - 1,885
  • राधानगरी - 1,261
  • शाहूवाडी - 1,366
  • शिरोळ - 2,517
  • नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7,591
  • कोल्हापुर महानगरपालिका - 16,021
  • इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2,558

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.