कोल्हापूर - अत्यंत चुरशीची झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन जागांसाठीच्या पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या दोन्ही जागा काँग्रेस - राष्ट्रवादी स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. दोन्ही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक एक उमेदवार विजयी झाला असून भाजप - ताराराणी आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार पराभूत झाले आहेत.
सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जय पटकारे तर शिवाजी पेठेतील प्रभागातून राष्ट्रवादीचे अजित राऊत हे उमेदवार विजयी झाले आहेत. कॉग्रेसचे जय पटकारे यांनी ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनुले आणि अपक्ष उमेदवार सुशिल भांदिगरे यांचा पराभव केलाय.
पद्माराजे प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित राऊत यांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर मात करत विजय संपादन केलाय. राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार पियुष चव्हाण यांचा पराभव केलाय.