कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तिसरा 1 हजार 500 कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला एक वेगळीच कला आहे. मुश्रीफ यांनी आपल्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीला दिले आहे. स्वतःच्या जावयाला म्हणजेच, मतीन मंगोलो यांना हे टेंडर दिले असून यामध्ये 1 हजार 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.
हेही वाचा - महापालिका घरफाळा, देवस्थान समिती घोटाळाही मार्गी लावा; आपचे सोमैयांना पत्र
हॉस्टेल चालविणाऱ्या कंपनीला जीएसटी, टीडीएस, टीसीएस रिटर्न्स भरण्याचा कोणताही अनुभव नसताना 1 हजार 500 कोटींचे काम देण्यात आले, असा आरोपही सोमैया यांनी केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर याबाबत मुरगुड पोलिसात अधिकृत तक्रार देण्यासाठी आज स्वतः सोमैया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत आणखी एका घोटाळ्याचा आरोप करत चौथासुद्धा घोटाळा लवकरच जाहीर करणार, असे सांगितले.
सोमैयांनी काय केले आरोप? यावर एक नजर :
1) जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दीडशे कोटींचे काम ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
2) या कंपनीचा मार्च 2020 ला शून्य टर्नओवर आहे.
3) हॉस्टेल चालवणाऱ्या कंपनीला नाव बदलून 1 हजार 500 कोटींचे टेंडर दिले.
4) टेंडर मिळण्याअगोदर जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे नाव यश हॉस्टेल्स प्रायव्हेट लिमिटेड होते. हे नाव बदलून जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड करण्यात आले. तसेच, संचालकही बदलण्यात आले.
5) हॉस्टेल चालवणार्या कंपनीला जीएसटी, टीडीएस, टीसीएस रिटर्न्स भरण्याचा कोणताही अनुभव नसताना 1 हजार 500 कोटींचे काम देण्यात आले.
6) 1 हजार 500 कोटींचे टेंडर दिलेल्या कंपनीचे संचालक अतुल रासकर पुण्यात एका चाळीत राहतात.
7) तब्बल दहा वर्षांसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे काम संबंधित कंपनीला दिले. काम समाधानकारक वाटली तर ही मुदत आणखी वाढणार आहे.
8) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील एजंट चंद्रकांत गायकवाड व मतीन मंगोली यांनी त्यांना हवी तशा अटी - शर्ती टाकून मंजूर करून घेतले. यात गायकवाड आणि मतीन मंगोली यांना मुश्रीफ आणि तत्कालीन ग्रामविकास सचिव अरविंद कुमार व विद्यमान ग्रामविकास सचिव राजेश कुमार यांनी मदत केली.
9) जयस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले टेंडर मंत्री मुश्रीफ यांचे 'कॉम्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट'चे उत्तम उदाहरण आहे, असेही सोमैया म्हणाले.
हेही वाचा - किरीट सोमैया आज कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नोटीस