ETV Bharat / city

कोल्हापूर : आगामी महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकांसाठी शिवसेनाचा स्वबळाचा नारा - कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना बैठक

कोल्हापुरात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली आहे.

Kolhapur Mnc election shivsena meeting
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना बैठक
author img

By

Published : Feb 13, 2022, 9:37 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली आहे. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील त्यांनी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत.

माहिती देताना शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर

हेही वाचा - Jayaprabha Studio In Kolhapur : जयप्रभा स्टुडिओचा वाद चिघळला, आंदोलकांकडून खरेदीदाराच्या ऑफिसवर शाई फेक

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आजी-माजी आमदार यांची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीबरोबरच येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. तर या निवडणुकीच्या अनुषंगाने 27 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात शिवसेनेचा भव्य मेळावा घेण्याचे नियोजन देखील करण्यात आले असल्याचे अरुण दुधवडकर यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान ज्या प्रकारे जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेनेन स्वबळावर लढवली त्याच पद्धतीने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितल. तर, उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी, या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यानुसारच शिवसेनेची भूमिका राहिला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावरच - अरुण दुधवडकर

सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळे, आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकून, शिवसेनेचा महापौर करून त्यांना मुख्यमंत्र्यांचा जवळ घेऊन जाऊ. तर, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पाचवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आग्रही असून, शिवसैनिकांच्याही याच भावना आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सादर करणार आहे. या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय होईल.

हेही वाचा - Jayaprabha Studio In Kolhapur : लता मंगेशकरांच्या 'जयप्रभा'साठी आजपासून साखळी उपोषण

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.