ETV Bharat / city

Kolhapur North By Election Result : कोल्हापुरात १३ उमेदवारांवर 'नोटा' पडला भारी.. पहा सविस्तर निकाल

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ( Kolhapur North By Election ) काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी ( Jayashree Jadhav Won Kolhapur North By-election ) झाल्या. तर भाजपचे सत्यजित कदम पराभूत झाले. या निवडणुकीत इतर १३ उमेदवारांना जनतेने पूर्णतः नाकारले आहे. नोटाला १७८८ मते पडली असून, इतर १३ उमेदवारांना मिळून १८५३ मते मिळाल्याने 'नोटा' भारी पडल्याचे दिसून येत ( NOTA Voting Kolhapur North By Election ) आहे.

author img

By

Published : Apr 16, 2022, 7:01 PM IST

कोल्हापुरात नोटाला १७८८ मते तर, १३ उमेदवारांना १८५३ मते.. पहा सविस्तर निकाल

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा ( Kolhapur North By Election ) निकाल हाती आला असून, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव 96176 मते मिळवून विजय झाल्या ( Jayashree Jadhav Won Kolhapur North By-election ) आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यासह एकूण 15 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र खरी लढत ही काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात दिसून आली. एकूण 18,750 मतांची आघाडी घेत जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. ही निवडणूक जरी जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम यांच्यात असली तरी, खरा सामना हा सतेज पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात होता. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही बाजूच्या वतीने राज्यातील नेत्यांना कोल्हापुरात आणून सभा रॅली घेत जोरदार प्रचार करण्यात आला होता. सतेज पाटील यांच्या परफेक्ट नियोजनामुळे जयश्री जाधव विजयी झाल्या. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील हे किंगमेकर ठरले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी १५ पैकी १३ उमेदवारांना नाकारल्याचे दिसून आले असून, तब्बल 1788 मते ही नोटाला देण्यात आली ( NOTA Voting Kolhapur North By Election ) आहेत.

अशी आहेत उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते :
1) जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात) : मिळालेली मते 96176
2) सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ): मिळालेली मते 77426
3) यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी): मिळालेली मते 318
4) विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा): मिळालेली मते 157
5) शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर): मिळालेली मते 455
6) सुभाष देसाई (चिन्ह - रोड रोलर):मिळालेली मते 95
7) बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर):मिळालेली मते 64
8) भारत भोसले (चिन्ह - कपाट):मिळालेली मते 43
9) मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन):मिळालेली मते 43
10) अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड):मिळालेली मते 51
11) अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर):मिळालेली मते 39
12) करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र):मिळालेली मते 133
13) राजेश नाईक (चिन्ह - किटली):मिळालेली मते 114
14) राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी):मिळालेली मते 108
15) संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद): मिळालेली मते 233
16) नोटा : मिळालेली मते 1788

हेही वाचा : कोल्हापुरात 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' गाणं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.