ETV Bharat / city

कोल्हापुरात सुद्धा घरपोच दारू मिळणार; अधीक्षक गणेश पाटील यांची माहिती - कोल्हापूरात घरपोहोच दारू

दारू दुकानांबाहेर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांना थेट घरपोच दारू देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोल्हापुरात सुद्धा ही योजना राबविण्यात येणार असून उद्यापासून याची सुरुवात होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी म्हंटले आहे.

Home delivery of liquor
घरपोहोच दारू मिळणार
author img

By

Published : May 14, 2020, 8:58 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारू दुकानांबाहेर होत असलेली गर्दी पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांना थेट घरपोच दारू देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सोय केवळ दारू पिण्याचा परवाना असणाऱ्या ग्राहकांना असणार आहे. कोल्हापुरात सुद्धा ही योजना राबविण्यात येणार असून उद्यापासून याची सुरुवात होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी म्हंटले आहे.

कोल्हापूरात सुद्धा घरपोहोच दारू मिळणार; अधीक्षक गणेश पाटील यांची माहिती

एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. त्यातच दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागू नयेत यासाठी हा घरपोच सुविधेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दारू आणि बिअर कशी घरपोहोच मिळणार आणि दुकानदारांनी घ्यावयाच्या काळजीबाबत अधीक्षक गणेश पाटील यांनी आज माहिती दिलीये. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणल्यानंतर सगळीकडेच गर्दी दिसून येत आहे. लोकांमध्ये अजुनही गांभीर्य नाहीये. शिवाय दारूची दुकानं सुद्धा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते फोनवरून ऑर्डर करून दारु घरी मागवू शकणार आहेत. यामध्ये वाईन शॉप आणि बिअर शॉप दोघांना घरपोहोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे.

सद्या जिल्ह्यात 42 दारूची दुकानं सुरू आहेत तर 140 हुन अधिक बिअर शॉप सुरू आहेत. या सर्व दुकानदारांनी आपल्या घरपोहोच सेवेसाठीचे नंबर दुकाणांबाहेर प्रसिद्ध करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्यांना दारू घरपोहोच मागवायची आहे ते सर्व दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपल्या घरी दारू मागवू शकणार आहेत. विशेष म्हणजे दारू पोहोच करणाऱ्या प्रत्येक 'डिलिव्हरी बॉय'ची आरोग्य तपासणी करून त्यांना नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या सर्वांवर गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना देण्याचे आदेश दिले आहेत असेही अधीक्षक गणेश पाटील यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.