कोल्हापूर - कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना, व्यक्ती गरजू आणि निराधार व्यक्तींना फूड पॅकेट्स वाटत आहेत. मात्र 23 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणीही घरातून बाहेर पडू नये. आपल्याला जर मदत करायचीच असेल तर कोल्हापूर पोलिसांनी सुरू केलेल्या संवेदना नावाच्या सामाजिक उपक्रमाला फूड पॅकेट्स देऊन मदत करू शकता असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.
गरजू आणि निराधार व्यक्तींना मोफत जेवण -
कोल्हापूर पोलिसांनी 'संवेदना' नावाचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून समाजातील गरजू आणि निराधार व्यक्तीसह कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी मोफत जेवण देण्याचा हा उपक्रम आहे.
कोरोना काळात सर्वांनी घराबाहेर पडणे योग्य नाही -
सद्या अनेक सामाजिक संघटना, विविध पक्ष, मंडळ आणि व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात मदत केली जात आहे. त्यामुळे अनेकजण मदत करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना काळात त्या सर्वांनी घराबाहेर पडणे योग्य नाही. सर्वांचे काम उल्लेखनीय आहे. मात्र आपल्याला मदत द्यायचीच असेल तर पोलिसांकडून ती गरजूंपर्यंत पोहोचवू असेही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले.
मदतगारांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात मदत करावी -
कोल्हापूर पोलिसांनी काही दिवसांपासून जिल्ह्यात संवेदना नावाचा सामाजिक उपक्रम सूरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना मोफत जेवण दिले जात आहे. कोणीही उपाशीपोटी झोपू नये हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला मदत द्यायची असेलच त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात मदत करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.
हेही वाचा - चक्रीवादळाचे नाव 'तौक्ते' कसे पडले? वाचा नावं कशी दिली जातात!