ETV Bharat / city

कुंकू असून विधवेसारखे जगणे असे मराठा आरक्षणाबाबत झाले - राजेंद्र कोंढरे - मराठा आरक्षण बातमी

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय आमच्या समाजातील कष्टकरी आणि शेतमजुरांच्या न्यायाच्या हक्काची लढाई आम्ही लढतच राहणार असून, राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी हा आक्रोश सुरू असल्याचे राजेंद्र कोंढरे म्हणाले.

Rajendra Kondhre
राजेंद्र कोंढरे- सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ
author img

By

Published : Oct 10, 2020, 7:56 PM IST

कोल्हापूर - आरक्षण हा आधी अपवाद होता तो आता नियम झाला आहे. त्यामुळे नियम झाल्यानंतर त्या नियमांची अंमलबजावणी करत असताना यंत्रणेत काही त्रुटी राहिल्या असतील तर राज्यकर्ते मतांच्या भीतीपोटी दुरुस्त करणार नसतील तर सामाजिक न्यायाबाबत मराठा समाजाकडून अपेक्षा करायची हे आता चालणार नसल्याचे मराठा आरक्षणाचे गाढे अभ्यासक तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी म्हटले आहे. तसेच कुंकू असूनसुद्धा विधवेसारखे जगणे असे मराठा आरक्षणाबाबत झाले असल्याचेही राजेंद्र कोंढरे यावेळी म्हणाले.

राजेंद्र कोंढरे- सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ

हेही वाचा - आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी परत या; आयुक्तांच्या बदली विरोधात 'आप'ची निदर्शने

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय आमच्या समाजातील कष्टकरी आणि शेतमजुरांच्या न्यायाच्या हक्काची लढाई आम्ही लढतच राहणार असून, राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी हा आक्रोश सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी कोंढरे पुढे म्हणाले, राज्यकर्त्यांनी आरक्षणासाठी काहीच केले नाही असे आम्ही अजिबात म्हणणार नाही. आरक्षण आणि राज्य शासनाची जी सर्व धोरणे आहेत ती जात आणि धर्मावर ठेवली आहेत आणि जेंव्हा या धोरणामुळे आम्ही बाहेर फेकलो जातो तेव्हा आम्हाला भांडावे लागते, आणि अशावेळी भांडत असताना मराठा राजकारण्यांचे एक अडचण येते ती म्हणजे जर ते प्रो मराठा वागले तर त्यांच्यावर मराठा म्हणून शिक्का मारला जातो म्हणून ते आमचे मूलभूत प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडवत नाहीत. त्यामुळे एखाद्या महिलेला कुंकू असून विधवेसारखे जगणे असे अनेक बाबतीत झाले असून, मराठा आरक्षणाबाबतीत सुद्धा असे झाले असल्याचे कोंढरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या घरण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबतसुद्धा राजेंद्र कोंढरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही प्रगल्भ समजतो. मात्र, त्यांनी छत्रपती घरण्याबाबत आदर ठेवायला हवा होता, त्यामध्ये ते कमी पडत असल्याचे कोंढरे यांनी म्हटले. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याबाबत आपल्या प्रत्येकाच्या मनात आदर असायला हवा आणि ती आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.