कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाल्याची घटना आज कोल्हापुरात घडली आहे. येथील राजारामपुरी टाकाळा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती ज्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोहिन्नूदिन जामदार (वय 70) आणि नियाज जामदार (वय 55) अशी दोन जखमींची जावे आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
कोल्हापुरात गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन जण गंभीर जखमी, घराचे छतही उडाले
घरगुती गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाल्याची घटना आज कोल्हापुरात घडली आहे. येथील राजारामपुरी टाकाळा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Gas cylinder explodes
कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाल्याची घटना आज कोल्हापुरात घडली आहे. येथील राजारामपुरी टाकाळा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती ज्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोहिन्नूदिन जामदार (वय 70) आणि नियाज जामदार (वय 55) अशी दोन जखमींची जावे आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
येथील राजारामपुरी दुसरी गल्ली (टाकाळा) परिसरात जामदार कुटुंब राहायला आहे. त्यांच्या राहत्या घरामध्ये आज सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेने संबंधित व्यक्तीच्या घरातील सर्व प्रापंचिक साहित्य उध्वस्त झाले असून घराचे छत सुद्धा उडून गेले आहे. दरम्यान, या घटनेचे माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सर्व परिस्थिती आटोक्यात आणत जखमींना तात्काळ येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने दोघेजण यामध्ये बचावले.