ETV Bharat / city

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकरी आक्रमक; कुरुंदवाड येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

author img

By

Published : Oct 8, 2021, 9:31 PM IST

Updated : Oct 8, 2021, 10:04 PM IST

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना 135 रूपये प्रमाणे मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचेही या शेतकऱ्यांनी म्हंटले आहे.

farmers
कुरुंदवाड येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर - पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुंठ्याला 135 रुपयेप्रमाणे मदत जाहीर केल्यानंतर आता शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. शिवाय राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना 135 रूपये प्रमाणे मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचेही या शेतकऱ्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असे म्हंटले आहे.

माहिती देताना राजू शेट्टी
  • सरकारविरोधात शेतकरी आक्रमक; भीक नको मदत द्या :

सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवर आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुरुंदवाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे त्यांनी दहन करत आपला रोष व्यक्त केला आहे. महापुरासह अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना सरकारने 2019 प्रमाणे मदत करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असेही या शेतकऱ्यांनी म्हंटले आहे. आम्हाला भीक नको मदत द्या असे म्हणत सरकार विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

  • मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द फिरवला :

राजू शेट्टी यांनीसुद्धा सरकारच्या मदतीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महापुरानंतर सरकारने जाहीर केलेली मदत पाहून शेतकऱ्यांना गुंठ्याला 135 रुपये प्रमाणेच मदत मिळणार हे मी आधीच सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही शेतकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना भरीव मदत देऊ असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपला शब्द फिरवला असून आता 135 रुपये प्रमाणे मदत जाहीर केली आहे. सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांना द्यायला का नाहीत? असा सवालसुद्धा शेट्टी यांनी यावेळी विचारला. शिवाय मंत्र्यांनी रोजगार हमीच्या कामावर जावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा महाविकास आघाडी सरकारला हे महागात पडेल, असा इशारासुद्धा शेट्टींनी दिला.

हेही वाचा - राजकीय सुडासाठी ईडी, आयकर विभागाचा वापर; राजू शेट्टींचा हल्लाबोल

Last Updated : Oct 8, 2021, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.