कोल्हापूर - गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील 58 डॉक्टर्स आणि सहयोगी प्राध्यापक उद्यापासून (गुरुवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने डॉक्टर संघटनेने हा इशारा दिला आहे. कोरोना काळात काम करून पगार मिळत नसल्याने डॉक्टर आणि सहयोगी प्राध्यापकांनी ही भूमिका घेतली आहे.
चार महिन्याच्या थकीत वेतनासाठी सीपीआरमधील डॉक्टर्स, प्राध्यापक गुरुवारपासून बेमुदत संपावर - सीपीआर रुग्णालय
गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील 58 डॉक्टर्स आणि सहयोगी प्राध्यापक उद्यापासून (गुरुवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने डॉक्टर संघटनेने हा इशारा दिला आहे.
cpr worker doctors strike
कोल्हापूर - गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील 58 डॉक्टर्स आणि सहयोगी प्राध्यापक उद्यापासून (गुरुवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने डॉक्टर संघटनेने हा इशारा दिला आहे. कोरोना काळात काम करून पगार मिळत नसल्याने डॉक्टर आणि सहयोगी प्राध्यापकांनी ही भूमिका घेतली आहे.
पगार न झाल्यास गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा डॉक्टर आणि प्राध्यापकांनी दिला आहे, असे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. जर उद्यापासून डॉक्टर्स आणि प्राध्यापक संपावर गेले तर ते त्या रुग्णालयावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.इतर वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन पीएए निधीतून केले जाते. मात्र कोल्हापुरात या निधीतून वेतन देण्यात जिल्हा कोषागार अधिकारी यांनी नकार दिला आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला असून चार महिन्याचा पगार थकला आहे.

Last Updated : Jul 21, 2021, 3:13 PM IST