ETV Bharat / city

कोल्हापूरात कोरोनाचे आणखी 2 बळी; एकूण मृत्यूंची संख्या 22

जिल्ह्यात एकूण 1 हजार 82 रुग्णांपैकी 797 जणांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 इतकी झाली आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 10, 2020, 4:52 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून आणखी दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 22 वर पोहोचली आहे. यामध्ये इचलकरंजी शहरात सर्वाधिक 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 18 रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाला घरी सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 82 रुग्णांपैकी 797 जणांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये करवीर तालुक्यातील वळीवडे गावातील 40 वर्षांचा व्यक्ती तर जिल्ह्याबाहेरील 75 वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे.

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 34 रुग्ण उरले होते. मात्र, झपाट्याने वाढत चाललेल्या रुग्ण संख्येमुळे टाळेबंदी कडक करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून म्हटले जात आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 95, भुदरगड- 79, चंदगड- 121, गडहिंग्लज- 118, गगनबावडा- 7, हातकणंगले- 22, कागल- 59,
करवीर- 46, पन्हाळा- 32, राधानगरी- 73, शाहूवाडी- 188, शिरोळ- 18, नगरपरिषद क्षेत्र- 125, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-75
असे एकूण जिल्ह्यात 1 हजार 58 कोरोना बाधित रुग्ण आहेत. जिल्हाबाहेरील 24 असे एकूण 1 हजार 82 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.