कोल्हापूर - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे पास केले याला काँग्रेस पक्ष सातत्याने विरोध करत आहे. याविरोधात आज विविध ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत. सरकारच्या या अन्यायी कायद्यांविरोधात महाराष्ट्र सरकारसुद्धा कायदे करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, आज कोल्हापुरात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून टॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनार काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱयांसह कार्यकर्ते उपस्थित आहेत.
हेही वाचा - कोल्हापूरातील श्रावणबाळ; जिने सांभाळ केला तिच्यासाठी बनवून घेतली चांदीची चप्पल